फोटो सौजन्य: @Mahindra_Auto (X.com)
जर तुम्ही Mahindra कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. मात्र, योग्य डिस्काउंटच्या प्रतीक्षेत असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार म्हंटलं की आपसूकच महिंद्राचे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. नुकतेच कंपनीने त्यांच्या 4 एसयूव्ही कॉन्सेप्ट कार 15 ऑगस्ट रोजी सादर केले. तसेच त्यांच्या लोकप्रिय एसयूव्हीवर डिस्कॉऊंट ऑफर देखील लाँच केले आहे.
जर तुम्ही महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये, कंपनी या मॉडेलवर एकूण 70000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, ॲक्सेसरीज, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बोनस समाविष्ट आहे. चला महिंद्रा स्कॉर्पिओची डिस्काउंट ऑफर, किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकच्या खरेदीवर 70000 रुपयांची सूट मिळत आहे. क्लासिकची एक्स-शोरूम किंमत 13.77 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 17.72 लाख रुपयांपर्यंत जाते. या महिन्यात 70 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह, ही एसयूव्ही आणखी बजेट फ्रेंडली झाली आहे. कंपनीकडून देण्यात येणारी सूट व्हेरिएंट आणि शोरूमनुसार बदलू शकते. दिल्लीतील वाहनाच्या ऑन-रोड किमतीबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत सुमारे 16 लाख रुपये असू शकते.
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात मोठी 9-इंच टचस्क्रीन तसेच ड्युअल-टोन ब्लॅक थीम आहे. ऑडिओ कंट्रोलसह, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, हाइट ॲडजेस्ट करण्यायोग्य ड्रायव्हर सीट, पार्ट ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकला 132hp, 300Nm, 2.2-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. यात ऑल ॲल्युमिनियम लाइटवेट GEN-2 mHawk इंजिन आहे. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये तुम्हाला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर, ABS आणि स्पीड अलर्ट सारखी फीचर्स मिळतात. याशिवाय, SUV मध्ये तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, LED DRL सह प्रोजेक्टर हेडलाइट्स सारखी फीचर्सही मिळतात. तसेच, या कारमध्ये तुम्हाला 460 लिटरच्या बूट स्पेससह 60 लिटरचे मोठे फ्युएल टॅंक देखील मिळते.