
नवीन थार OG मध्ये फक्त डिझाइन बदललेले नाही, तर तिच्या प्लॅटफॉर्ममध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. महिंद्राने M_Glyde 4G प्लॅटफॉर्मचा वापर केला असून स्ट्रक्चरची मजबुती वाढवण्यात आली आहे. मागच्या बाजूला Pentalink सस्पेंशनसोबत Watts Link देण्यात आला आहे. Frequency Dependent Damping आणि इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंगमुळे राइड क्वालिटी आणि ड्रायव्हिंगचा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केबिनमधील आवाज आणि व्हायब्रेशन कमी करण्यासाठी एक्स्ट्रा NVH इन्सुलेशनही मिळते.
महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन
इंजिन पर्यायांमध्ये 2.0-लिटर G20 TGDi mStallion पेट्रोल इंजिन 160 hp आणि 330 Nm टॉर्क देते. 2.2-लिटर D22 mHawk डिझेल इंजिन 150 hp आणि 330 Nm तयार करते, तर 1.5-लिटर D117 CRDe डिझेल इंजिन 117 hp आणि 300 Nm देते. 4WD व्हेरिएंटमध्ये Electronic Locking Differential तसेच Mud, Sand आणि Snow मोड मिळतात.
लूकच्या बाबतीत नवीन ग्रिल, C-आकाराचे DRL असलेले गोल LED हेडलॅम्प, अपडेटेड बंपर आणि नवीन LED टेललॅम्प देण्यात आले आहेत. टॉप ZXT मध्ये 19-इंच अलॉय व्हील्स मिळतात. Artemis Silver आणि Jeans Blue हे 2 नवीन रंगही जोडले आहेत. केबिनमध्ये ZXT ला Truffle Brown लेदरेट सीट्स आणि कपहोल्डर्ससह सॉफ्ट आर्मरेस्ट मिळतो.
सेफ्टीच्या बाबतीत ZXT मध्ये 6 एअरबॅग्स, त्यापैकी 4 HPTS एअरबॅग्स, ESP 9.3, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, रिअर कॅमेरा आणि TPMS देण्यात आले आहे. LXT मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, Android Auto, Apple CarPlay आणि क्रूझ कंट्रोल मिळते. ZXT मध्ये वायरलेस चार्जिंग, FDD आणि प्रीमियम लेदरेट इंटीरियरसह जास्त फीचर्स मिळतात.
महिंद्राच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 4 लाखांहून जास्त ग्राहक थार कम्युनिटीशी जोडले गेले आहेत. नवीन थार OG मध्ये ओळखीचा 3-डोअर सिल्हूट कायम ठेवत प्लॅटफॉर्म, सस्पेंशन, इंजिन, ऑफ-रोड टेक्नोलॉजी आणि सेफ्टीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.