(फोटो सौजन्य-AI एआय)
महिंद्रा XUV 3XO ZNG ने भारतातील Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच झालेल्या या फॅक्टरी-फिटेड CNG कॉम्पॅक्ट SUV ने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 32 पैकी 29.36 गुण, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 मार्क्स मिळवले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, 5 स्टार रेटिंग मिळवणारी ही भारतातील पहिली सब-कॉम्पॅक्ट CNG SUV ठरली आहे. याआधी पेट्रोल XUV 3XO ला 2024 मध्ये याच संस्थेकडून 5 स्टार रेटिंग मिळाली होती.
इंजिन आणि मायलेज
महिंद्रा XUV 3XO ZNG मध्ये 1.2-लिटर, 3-सिलिंडर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही मोडमध्ये 110 hp पॉवर आणि 200 Nm टॉर्क देते. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. CNG मोडमध्ये 0 ते 60 kmph वेग गाठण्यासाठी 4.9 सेकंद, तर 0 ते 100 kmph साठी 11.8 सेकंद लागतात, असा कंपनीचा दावा आहे. या SUV चे प्रमाणित मायलेज 24.7 km/kg आहे.
बूट स्पेस आणि किंमत
या SUV मध्ये ड्युअल-सिलिंडर CNG सिस्टीम लगेज कंपार्टमेंटखाली बसवली आहे. त्यामुळे सपाट लोडिंग फ्लोअर आणि 270 लिटर बूट स्पेस मिळते. पेट्रोल मॉडेलमध्ये 364 लिटर जागा असल्याने CNG व्हर्जनमध्ये 94 लिटर जागा कमी होते. स्पेअर व्हील गाडीच्या खालच्या बाजूला बसवले आहे.
XUV 3XO ZNG चार व्हेरिएंटमध्ये अव्हेलेबल आहे. MX Edge ची एक्स-शोरूम किंमत ₹9.99 लाख, RevX Edge (O) ₹10.79 लाख, AX5 ₹11.19 लाख आणि RevX A ₹12.27 लाख आहे.
महिंद्रा व्हिजन S चा एक्स्टेरियर आणि इंटेरियर स्पाय फोटो आले समोर! 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता
सेफ्टी फीचर्स आणि व्हेरिएंट्स
या SUV मध्ये 35 पेक्षा जास्त स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आहेत. त्यात 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट्सचा समावेश आहे. CNG गॅस लीक झाल्यास सिस्टीम आपोआप पेट्रोल मोडवर स्विच होते. CNG कमी झाल्यावरही ऑटो स्विचओव्हर फंक्शन वर्किंग होते.
MX Edge मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्सिंग कॅमेरा मिळतो. AX5 मध्ये ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड फीचर्स आहेत. टॉप RevX A मध्ये सनरूफ, Dolby Atmos ऑडिओ आणि ब्लॅक लेदररेट सीट्स मिळतात. टाटा नेक्सॉन CNG आणि मारुती सुझुकी ब्रेझा CNG या तिच्या प्रतिस्पर्धी गाड्या आहेत.






