Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज

महिंद्रा पुढील काही वर्षांत भारतीय बाजारात एसयूव्हींची मोठी फौज उतरवण्याच्या तयारीत आहे. अपडेटेड थार, नवीन बीई 07 आणि ऑफ-रोड इलेक्ट्रिक एसयूव्हीसह अनेक मॉडेल्स येणार असून, यापैकी कोणते वाहन भारतीय ग्राहकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेईल, याची उत्सुकता वाढली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 08, 2026 | 09:22 AM
Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज
Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा 2027 मध्ये NU_IQ प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन मध्यम आकाराची एसयूव्ही भारतीय बाजारात आणू शकते.
  • लोकप्रिय 3-डोअर थारला नवीन डिझाइन, मोठी टचस्क्रीन आणि रॉक्सप्रेरित आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
  • बीई 07 आणि व्हिजन T आधारित इलेक्ट्रिक ऑफ-रोडर महिंद्राची भविष्यातील ईव्ही रणनीती मजबूत करतील.
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एसयूव्हींची मागणी सातत्याने वाढत असताना महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांसाठी मोठ्या उत्पादन मोहिमेची तयारी करत आहे. कंपनीकडे अपडेटेड 3-डोअर थार, नव्या NU_IQ प्लॅटफॉर्मवरील एसयूव्ही, बीई 07, व्हिजन T प्रेरित इलेक्ट्रिक ऑफ-रोडर आणि स्कॉर्पिओ लाइफस्टायलर यांसारखी अनेक महत्त्वाची मॉडेल्स पाइपलाइनमध्ये असल्याची चर्चा आहे.

कोणत्या इंजिन पर्यायांत येणार?

या सिरीजमधील सर्वात आधी येणाऱ्या मॉडेलपैकी एक व्हिजन S कॉन्सेप्टवर आधारित एसयूव्ही असू शकते. तिचे भारतात लाँचिंग 2027 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. ही एसयूव्ही एक्सयूव्ही 3एक्सओ आणि स्कॉर्पिओ N यांच्या दरम्यान स्थान मिळवू शकते. उंच आणि दमदार बॉडी डिझाइनसह येणाऱ्या या मॉडेलमध्ये टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय मिळण्याची शक्यता असून भविष्यात इलेक्ट्रिक व्हेरिएंटचाही विचार केला जाऊ शकतो.

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत

थार मध्येही होणारे मोठे चेंज?

लोकप्रिय 3-डोअर महिंद्रा थारलाही मोठे अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या मॉडेलवरून थार रॉक्सच्या डिझाइनचा प्रभाव नवीन आवृत्तीवर दिसू शकतो. नवीन लाइटिंग, बदललेले बंपर आणि अधिक आधुनिक एक्सटेरियर दिले जाऊ शकते. केबिनमध्ये मोठी टचस्क्रीन, नवीन फीचर्स आणि अधिक प्रीमियम उपकरणांची भर पडण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांचीही मोठी रेलचेल!

महिंद्राच्या इलेक्ट्रिक रेंजमध्ये बीई 07 महत्त्वाची भूमिका बजावेल. ही बीई 6 पेक्षा मोठी इलेक्ट्रिक एसयूव्ही असून ती INGLO स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित असण्याची शक्यता आहे. मोठ्या बॅटरी पॅकसह तिची प्रत्यक्ष वापरातील रेंज 500 किमीपेक्षा जास्त असू शकते. 3 स्वतंत्र 12.3-इंच डिस्प्ले, लेव्हल 2 ADAS आणि बाय-डायरेक्शनल चार्जिंगसारखे फीचर्सही मिळण्याची अपेक्षा आहे.

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?

याशिवाय व्हिजन T कॉन्सेप्टवर आधारित इलेक्ट्रिक ऑफ-रोडर 2028 च्या आसपास बाजारात येऊ शकतो. यात AWD साठी ड्युअल-मोटर सेटअप आणि ऑफ-रोडिंगवर अधिक भर दिला जाऊ शकतो. दुसरीकडे, स्कॉर्पिओ लाइफस्टायलरही पुढील वर्षी बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिंद्रा पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही विभागांत आपली एसयूव्ही उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Web Title: Mahindra upcoming suvs india thar be07 vision t auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • Mahindra

संबंधित बातम्या

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक
1

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत
2

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत

रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घ्यायची नाही? याच बजेटमध्ये या 5 बाइक्सही आहेत दमदार पर्याय
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घ्यायची नाही? याच बजेटमध्ये या 5 बाइक्सही आहेत दमदार पर्याय

मारुतीची 10 लाखांची ईव्ही; देऊ शकेल का टाटा टियागो ईव्हीला टक्कर! बजेट ईव्ही आणि एसयूव्हीच्या महासंग्रामात कोण पडेल कोणावर भारी!
4

मारुतीची 10 लाखांची ईव्ही; देऊ शकेल का टाटा टियागो ईव्हीला टक्कर! बजेट ईव्ही आणि एसयूव्हीच्या महासंग्रामात कोण पडेल कोणावर भारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.