फोटो सौजन्य: iStock
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यातही सर्वाधिक मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. याच सेगमेंटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून Mahindra कंपनी दमदार कार ऑफर करत आहे. कंपनीच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय सुद्धा ठरल्या, ज्यांना आजही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा कंपनीने दमदार एसयूव्ही लाँच केल्या आहेत. नुकतेच कंपनी त्यांच्या एका महत्वाच्या घोषणेमुळे चर्चेत आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की E20 इंधन (20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) वापरले तरीही वाहनांची वॉरंटी पूर्णपणे वैध राहील. अलीकडेच काही अहवाल समोर आले होते ज्यात E20 इंधनाचा इंजिनवर होणारा परिणाम आणि वॉरंटीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता महिंद्राच्या या घोषणेमुळे ग्राहकांच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत.
Kawasaki Eliminator 400 चा नवा स्पेशल एडिशन लाँच, आता चक्क बाईकमध्ये मिळणार ड्युअल कॅमेरा
ग्राहकांमध्ये अशी चिंता होती की E20 फ्युएल वापरल्यामुळे त्यांच्या वाहनांचे परफॉर्मन्स आणि विश्वसनीयता कमी होऊ शकते तसेच कदाचित वॉरंटीही संपुष्टात येऊ शकते. यावर महिंद्राने स्पष्ट भूमिका घेत सांगितले की त्यांची सर्व वाहने E20 फ्युएलवर सुरक्षितरीत्या चालवली जाऊ शकतात आणि त्यांना फुल वॉरंटी देखील प्रदान करण्यात येईल.
तथापि, कंपनीने हेही स्पष्ट केले की 1 एप्रिल 2025 पूर्वी तयार झालेल्या मॉडेल्समध्ये ॲक्सेलरेशन आणि फ्युएल एफिशियन्सीमध्ये थोडाफार फरक दिसू शकतो. मात्र हा फरक पूर्णपणे ड्रायव्हिंग स्टाइलवर अवलंबून असेल आणि कारच्या सुरक्षेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
महिंद्राने सांगितले की 1 एप्रिल 2025 नंतर तयार होणारी सर्व वाहने E20 फ्युएलवर परफॉर्मन्स आणि मायलेजमध्ये कोणताही फरक न पडता चालतील. ही वाहने खास या फ्युएलसाठी कॅलिब्रेट करण्यात आली आहेत. कंपनीने यावर भर देत सांगितले की एक जबाबदार वाहन उत्पादक कंपनी म्हणून ते आपल्या सर्व ग्राहकांना वॉरंटीचा पूर्ण लाभ देत राहील.
भारत सरकार स्वच्छ ऊर्जा रोडमॅप अंतर्गत इथेनॉल मिश्रित इंधनाला प्रोत्साहन देत आहे. देशभरात E20 पेट्रोलची उपलब्धता वाढत आहे. महिंद्राने सांगितले की ते नेहमीच बायोफ्युएल आणि पर्यायी इंधन स्वीकारण्यात सरकारच्या पाठीशी उभे आहे.