Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर

भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी मार्केटमध्ये त्यांची नवीन इलेक्ट्रिक 7 सीटर एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 07, 2025 | 08:57 PM
फोटो सौजन्य: @mahindraesuvs/ X.com

फोटो सौजन्य: @mahindraesuvs/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • Mahindra XEV 9S ची पहिली झलक
  • टिझरमध्ये Mahindra XEV 9S च्या इंटिरिअरची माहिती मिळाली
  • किती असेल संभाव्य किंमत? जाणून घ्या 
भारतात कार खरेदीदारांचा सर्वाधिक लोकप्रिय सेगमेंट म्हणजे एसयूव्ही. हीच बाब लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या भारतात दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. मात्र, आजही या सेगमेंटमध्ये Mahindra कंपनी एकतर्फी सत्ता गाजवत आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत. अशातच आता कंपनी त्यांची 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

महिंद्रा त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक मॉडेल, XEV 9S लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच एक टीझर आणि या SUV च्या इंटिरिअरचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे, ज्यामुळे कारप्रेमी या कारची वाट पाहत आहे. महिंद्राने अधिकृतपणे घोषणा केली आहे की XEV 9S येत्या 27 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच केली जाईल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Big Space for your Big Plans. Coming Soon! Spacious cabin, sliding second row seats, first-class comfort and a lot more. Here’s a glimpse into the interiors of the The Big New Electric XEV 9S.
Premiering at #ScreamElectric on 27th November 2025.… pic.twitter.com/rppYW81Tq7
— Mahindra Electric Origin SUVs (@mahindraesuvs) November 4, 2025

नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक

XEV 9S डिझाइन आणि इंटिरिअर

महिंद्राच्या नवीन टीझरवरून असे दिसून येते की XEV 9S चा इंटिरिअर डिझाइन मोठ्या प्रमाणात XEV 9e वरून प्रेरित आहे. SUV मध्ये तीन मोठ्या 12.3-इंच डिजिटल स्क्रीन आहेत – एक ड्रायव्हरसाठी, दुसरी इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आणि तिसरी समोरील प्रवाशासाठी. डॅशबोर्डमध्ये चमकदार इन्फिनिटी लोगोसह दोन-स्पोक स्टीअरिंग व्हील आहे. केबिनमध्ये लेदर अपहोल्स्ट्री, मेटल फिनिश आणि ॲम्बियंट लाइटिंगचे अत्याधुनिक कॉम्बिनेशन आहे, जे त्याला प्रीमियम फील देते. SUV मध्ये एक मोठे पॅनोरॅमिक सनरूफ देखील आहे, ज्यामुळे केबिन प्रशस्त आणि आलिशान वाटते.

किती असेल रेंज?

महिंद्रा XEV 9S मध्ये XEV 9e सारखीच बॅटरी सिस्टम असण्याची अपेक्षा आहे. कंपनी ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह आणायची योजना आखत आहे. पहिल्या व्हर्जनमध्ये 79 kWh बॅटरी पॅक असेल, जो अंदाजे 656 किलोमीटरची रेंज देईल. त्यात DC फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल, जो लांब प्रवासासाठी उत्तम असेल. तर दुसऱ्या व्हर्जनमध्ये 59 kWh बॅटरी पॅक असेल, जो अंदाजे 542 किलोमीटरची रेंज देईल.

Royal Enfield Bullet 650 की Classic 650? कोणती बाईक तुमच्यासाठी आहे परफेक्ट?

किती असेल किंमत?

महिंद्रा 27 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात XEV 9S चे अधिकृत लाँचिंग करणार आहे. लाँचनंतर या SUV ची स्पर्धा Tata Harrier EV, Hyundai Ioniq 5, आणि MG ZS EV सारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक SUVs सोबत होईल. कंपनी ही SUV आपल्या “Born Electric” ब्रँडअंतर्गत सादर करणार आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, ही SUV सुमारे 40 लाख ते 45 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान लाँच होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Mahindra xev 9s teaser released know launch date and expected price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या
1

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या

Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय
2

Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय

TATA Sierra चा दबदबा, आव्हान देण्यासाठी 3 धाकड SUV येणार बाजारात, सेल्टोसपासून डस्टरपर्यंत सर्व तयार
3

TATA Sierra चा दबदबा, आव्हान देण्यासाठी 3 धाकड SUV येणार बाजारात, सेल्टोसपासून डस्टरपर्यंत सर्व तयार

Triple Riding Challan Price: खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
4

Triple Riding Challan Price: खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.