फोटो सौजन्य: Gemini
भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. देशात अनेक आघाडीच्या बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या वेगवगळ्या CC सेगमेंटमध्ये बाईक ऑफर करतात. अशीच एक कंपनी म्हणजे Hero MotoCorp. कंपनीच्या अनेक बाईक भारतात लोकप्रिय आहेत. आता लवकरच कंपनी त्यांची नवीन स्ट्रीट फायटर बाईक लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.
हिरो मोटोकॉर्प लवकरच त्यांची स्ट्रीट-फायटर बाईक, 2026 Hero Xtreme 160R, भारतीय बाजारात लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वी, कंपनीने ही बाईक शोरूममध्ये प्रदर्शित केली आहे. नुकतेच एका डीलर कार्यक्रमात याचे अनावरण देखील करण्यात आले. यात अनेक महत्त्वपूर्ण बदल आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Royal Enfield Bullet 650 की Classic 650? कोणती बाईक तुमच्यासाठी आहे परफेक्ट?
शोरूममध्ये शोकेस करण्यात आलेल्या नवीन Xtreme 160R मध्ये दमदार डिझाइन आणि अपडेटेड फीचर्स पाहायला मिळतात. या नवीन मॉडेलला Xtreme 250R प्रमाणे अपडेट करण्यात आले असून, यात नवीन हेडलाइट डिझाइन आणि हेडलाइट कन्सोल देण्यात आला आहे, जो दिसायला अगदी Xtreme 250R सारखाच आहे. ही बाईक ग्रे कलर आणि युनिक ग्राफिक्ससह सादर करण्यात आली आहे. नवीन डीआरलाइट कन्सोल जुन्या मॉडेलपेक्षा जास्त प्रीमियम फील देतो.
या बाईकमध्ये अपडेटेड क्रूज कंट्रोल देण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल (राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी) च्या मदतीने हा फीचर समाविष्ट केला गेला आहे. हेच सिस्टम यापूर्वी Hero Glamour X आणि Xtreme 125R मध्ये दिले गेले होते. आता हा फीचर इतरही Hero मॉडेल्समध्ये दिसेल.
ही तर फक्त नावालाच स्कूटर! बाईकसारखी दिसणारी ‘ही’ नवीन Electric Scooter फक्त 64,999 किमतीत लाँच
यामध्ये नवीन LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले असून त्यात ब्लूटूथ आणि नेव्हिगेशन फीचर्स उपलब्ध आहेत. लेफ्ट-साइड स्विचगिअरच्या मदतीने हा LCD क्लस्टर कंट्रोल करता येतो. याशिवाय, बाईकमध्ये राइड मोड्स आणि ड्युअल-चॅनेल ABS देखील मिळते. सध्या यात Type-A USB पोर्ट देण्यात आला आहे, तर 2026 Xtreme 125R आणि Glamour X मध्ये Type-C पोर्ट देण्यात आला होता.
यात पूर्वीप्रमाणेच 163.2cc सिंगल-सिलेंडर, 4V/cyl ऑइल-कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 16.6 bhp ची पॉवर आणि 14.6 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स सोबत जोडण्यात आले आहे.
Ans: ही बाईक 2026 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने शोरूममध्ये ती प्रदर्शित केली असल्याने लाँच टाइमलाइन जवळ आल्याचे संकेत मिळतात.
Ans: नवीन मॉडेलमध्ये Xtreme 250R सारखा हेडलाइट डिझाइन, अपडेटेड क्रूज कंट्रोल, नवीन LCD क्लस्टर, ब्लूटूथ-कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, राइड मोड्स आणि ड्युअल-चॅनेल ABS यांसारखे आधुनिक फीचर्स मिळणार आहेत.
Ans: होय, यात पूर्वीसारखेच 163.2cc सिंगल-सिलेंडर, 4V/cyl ऑइल-कूल्ड इंजिन दिले गेले आहे, जे 16.6 bhp पॉवर आणि 14.6 Nm टॉर्क तयार करते. मात्र, आता त्याला 6-स्पीड गिअरबॉक्सची जोड मिळाली असल्याने परफॉर्मन्स अधिक सुधारला आहे.






