फोटो सौजन्य: @OtsileJK (X.com)
भारतीय बाजारात अनेक दमदार कार ऑफर केल्या जातात. यातही सर्वात जास्त मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना असते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये एसयूव्ही कार ऑफर करत असतात. Mahindra सुद्धा देशात अनेक उत्तम एसयूव्ही कार्स ऑफर करते. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये BE 6 आणि XEV 9e या इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने आपल्या एका एसयूव्हीच्या किमतीत घट केली आहे.
भारतातील आघाडीच्या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या महिंद्रा अनेक सेगमेंटमध्ये एसयूव्ही विकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने त्यांच्या एका एसयूव्हीची किंमत कमी केली आहे. Mahindra XUV 3XO असे या एसयूव्हीचे नाव आहे.
Kia Sonet Vs Maruti Breeza: मायलेज, इंजिन, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?
रिपोर्ट्सनुसार, महिंद्राने ऑफर केलेल्या एसयूव्हीची किंमत कमी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केलेल्या महिंद्र एक्सयूव्ही 3XO च्या एका व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्राने महिंद्राच्या XUV 3XO च्या AX5 व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 20,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
महिंद्राने अलीकडेच महिंद्राच्या XUV 3XO चा REVX व्हेरिएंट लाँच केला आहे. लाँच झाल्यानंतर, हा नवीन व्हेरिएंट AX5 आणि AX5L दरम्यान ठेवण्यात आला आहे. त्यानंतर AX5 ची किंमत कमी करण्यात आली आहे.
सिंगल चार्जवर 548 KM ची रेंज ! प्रिमियम इलेक्ट्रिक कार MG M9 झाली लाँच, किंमत किती?
किंमत कमी झाल्यानंतर, SUV च्या AX5 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता 10.99 लाख रुपयांपासून सुरू होईल. त्याच वेळी, डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12.19 लाख रुपयांपासून सुरू होईल.
XUV 3XO ही महिंद्राने सब-फोर मीटर SUV सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. या सेगमेंटमध्ये, ती मारुती ब्रेझा, किआ सोनेट, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सायरोस, स्कोडा क्यलॅक सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करते.