फोटो सौजन्य: X.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. यातही सर्वात जास्त मागणी ही SUV सेगमेंटमधील कार्सना असते. आता तर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच होत आहे.
अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. या सेगमेंटमध्ये Kia Sonet आणि Maruti Breeza लोकप्रिय आहेत. दोन्ही एसयूव्हीमध्ये इंजिन किती पॉवरफुल आहे? कोणत्या प्रकारचे फीचर्स यात उपलब्ध आहेत? या कार कोणत्या किंमतीत दिल्या जातात? यापैकी कोणती एसयूव्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकते. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
सिंगल चार्जवर 548 KM ची रेंज ! प्रिमियम इलेक्ट्रिक कार MG M9 झाली लाँच, किंमत किती?
Kia Sonet मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी लाईट्स, ड्युअल टोन एक्सटिरिअर, 16 इंच अलॉय व्हील्स, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, बोस ऑडिओ सिस्टम, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिअर एसी व्हेंट, ऑटो टेम्परेचर कंट्रोल अशी फीचर्स आहेत.
त्याच वेळी, मारुती ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, नऊ इंचाचा स्मार्ट प्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, रियर एसी व्हेंट, प्रोजेक्टर हेडलॅम्प, शार्क फिन अँटेना, गियर शिफ्ट इंडिकेटर अशी फीचर्स आहेत.
किया सोनेटमध्ये अनेक इंजिन ऑप्शन्स दिले आहेत. यामध्ये 1.2 लिटर स्मार्टस्ट्रीम, एक लिटर टर्बो पेट्रोल, 1.5 लिटर सीआरडीआय डिझेल इंजिनचा समावेश आहे. इंजिनसोबतच, या एसयूव्हीमध्ये अनेक ट्रान्समिशन पर्याय देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड आयएमटी, 7 स्पीड डीसीटी, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड ऑटोमॅटिक यांचा समावेश आहे.
फक्त 15 हजार रुपयांचा असेल EMI ! Maruti Suzuki Ertiga साठी किती करावा लागेल डाउन पेमेंट?
मारुती ब्रेझ्झाला 1.5 लिटर क्षमतेचे K15C स्मार्ट हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. जे याला 103.1 पीएसची पॉवर आणि 136.8 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. यात 48 लिटरचे फ्युएल टॅंक आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह, ही एसयूव्ही एका लिटरमध्ये 19.89 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, ही एसयूव्ही 19.80 किलोमीटर मायलेज देते.
किआ सोनेटची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १४.९९ लाख रुपये आहे.
त्याच वेळी, मारुती ब्रेझा एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ८.६९ लाख रुपये आहे आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १३.९८ लाख रुपये आहे.