फोटो सौजन्य: @MahindraGlobal (X.com)
भारतात जसे वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे, तसेच जगभरातील मार्केटमध्ये सुद्धा विविध वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. त्यामुळेच अनेक भारतीय ऑटो कंपन्या जगभरात देखील आपल्या दमदार कार्स ऑफर करत असतात. नुकतेच महिंद्राने आपली दमदार एसयूव्ही Mahindra XUV 3XO ऑस्ट्रेलियात लाँच केली आहे.
आजही दमदार आणि हाय परफॉर्मन्स एसयूव्ही म्हंटलं की महिंद्राच्या एसयूव्हीचे नाव आपल्या समोर येते. आता कंपनीने आपली सब 4 मीटर एसयूव्ही Mahindra XUV 3XO ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये लाँच केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लाँच होणारी ही कंपनीची चौथी कार आहे. यापूर्वी महिंद्र स्कॉर्पिओ, XUV700 आणि S11 4X4 Pikup लाँच करण्यात आली आहेत, ज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चला जाणून या एसयूव्हीला ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्या फीचर्ससह लाँच करण्यात आले आहे.
येत्या 15 ऑगस्ट 2025 ला Mahindra सादर करणार 4 नवीन कॉन्सेप्ट SUVs, Vision SXT चा टिझर लाँच
AX5L: AUD 23,490 (अंदाजे रु. 13.18 लाख)
AX7L: AUD 26,490 (अंदाजे रु. 14.87 लाख)
या किमती ड्रायव्हिंग-अवे किमती आहेत, ज्यामध्ये टॅक्स, रजिस्ट्रेशन आणि सर्व ऑन-रोड खर्च समाविष्ट आहेत. ही सुरुवातीची ऑफर 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वैध आहे. सप्टेंबरपासून या कारची किंमत 500 AUD ने वाढेल.
डिझाइनच्या बाबतीत, महिंद्रा XUV 3XO चा एक्सटिरिअर भारतीय व्हर्जन सारखाच आहे. यात C-आकाराचे LED DRL, बोल्ड फ्रंट ग्रिल, इनोव्हेटिव्ह इन्फिनिटी टेललॅम्प, AX5L मध्ये 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, AX7L मध्ये 17-इंच मोठे अलॉय व्हील्स आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये एव्हरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, स्टील्थ ब्लॅक आणि टँगो रेडसह लाँच केले गेले आहे, परंतु AX7L सिट्रिन यलो एक्सक्लुझिव्ह रंगात ऑफर केले आहे.
हाच तो गोल्डन चान्स ! 27 KM चा मायलेज देणाऱ्या कारची किंमत 95000 रुपयांनी कमी
ही एक फुल-लोडेड स्मार्ट एसयूव्ही आहे. यामागील कारण म्हणजे त्यात उपलब्ध असलेले दमदार फीचर्स. यात 10.25-इंच एचडी टचस्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, लेदर रॅप्ड स्टीअरिंग आणि गियर नॉब, इलेक्ट्रिक फोल्डिंग ओआरव्हीएम सारखी फीचर्स आहेत. त्याच वेळी, हरमन कार्डन प्रीमियम साउंड सिस्टम, ब्लॅक लेदरेट सीट्स आणि सॉफ्ट टच डॅशबोर्ड, AX7L व्हेरिएंटमध्ये स्कायरूफ, 360 डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि ADAS सिस्टमचे ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन अलर्ट, ट्रॅफिक साइन रेकग्निशन सारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये, महिंद्रा XUV 3XO फक्त 1.2L mStallion टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 110 hp पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.ही एसयूव्ही ऑस्ट्रेलियामध्ये Chery Tiggo 4, Mazda CX-3, MG ZS, Kia Stonic आणि Hyundai Venue सारख्या कॉम्पॅक्ट SUV शी स्पर्धा करेल.