फोटो सौजन्य: @Mahindra_Auto (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात कार्सचे विविध सेगमेंट उपलब्ध आहेत, मात्र एसयूव्ही सेगमेंटला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळते. त्यामुळेच बहुतांश ऑटोमोबाईल कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करत आहेत. या सेगमेंटमध्ये मजबुती, स्पेस, ग्राउंड क्लीयरन्स आणि आकर्षक लूक यामुळे एसयूव्ही कार्सना अधिक मागणी असते.
ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आता या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्ससुद्धा जोरदार एंट्री घेत आहेत. स्वस्त देखभाल, उत्तम परफॉर्मन्स आणि जबरदस्त टेक्नोलॉजी यामुळे इलेक्ट्रिक एसयूव्हींची लोकप्रियता वेगाने वाढत आहे.
हाच तो गोल्डन चान्स ! 27 KM चा मायलेज देणाऱ्या कारची किंमत 95000 रुपयांनी कमी
भारतात अनेक एसयूव्ही उत्पादक कंपन्या आहेत. महिंद्रा ही त्यातीलच एक. आता कंपनी 15 ऑगस्ट 2025 रोजी आणखी एक मोठा धमाका करणार आहे. महिंद्रा या दिवशी त्यांचे 4 नवीन कॉन्सेप्ट एसयूव्ही सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे नाव Freedom_NU ठेवण्यात आले आहे. कंपनीने आता आणखी एक टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये व्हिजन एसएक्सटी दिसला आहे. ही महिंद्राची तिसरी कॉन्सेप्ट एसयूव्ही व्हिजन एसएक्सटी आहे, याआधी कंपनीने Vision T आणि Vision S चा टीझर रिलीज केला आहे.
A Vision designed for bold adventures. Vision.SXT lands 15th August 2025 at #FREEDOM_NU.#MahindraAuto #MahindraElectricOriginSUVs pic.twitter.com/TnkdmBEsQP
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) July 4, 2025
महिंद्रा Vision SXT ला “A vision designed for bold adventures” असे म्हणते. ही एसयूव्ही ऑफ-रोडिंगवर लक्ष केंद्रित करेल. यात एक्स्टर्नल बोनेट हिंग्ज, क्लॅमशेल बोनेट डिझाइन, बोनेटवर शार्प ग्रूव्ह्स, रुंद व्हील आर्च, ऑफ-रोडिंगसाठी मोठे आणि रुंद टायर्स, व उंच फ्रंट बंपर आहे. एकंदरीत, Vision SXT ची रचना खूपच मस्क्युलर आणि आक्रमक आहे. याचा लूक आर्मर्ड मिलिटरी व्हेइकलची आठवण करून देतो, ज्यामुळे रस्त्यावर या कारचा प्रेझेन्स आणखी पॉवरफुल होईल.
नव्या इंजिनसह लाँच झाली Hero Xoom 110, फीचर्स दमदार मात्र किमतीतही वाढ
सर्व नवीन महिंद्रा एसयूव्ही NU मल्टी-एनर्जी प्लॅटफॉर्मवर बनवल्या जात आहेत. याचा अर्थ असा की या एसयूव्ही पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनला सपोर्ट करतील. या प्लॅटफॉर्मद्वारे, कंपनी ग्लोबल मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
Vision T, Vision S आणि आता Vision SXT चे टीझर रिलीज झाले आहेत. महिंद्रा 15 ऑगस्ट 2025 रोजी आणखी एक व्हिजन कॉन्सेप्ट सादर करण्याची अपेक्षा आहे.