Maruti 800 Wins Global Vehicle Heritage Award (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील लोकप्रिय कार मारुती 800 ने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मान उंचावला आहे. या कारला प्रतिष्ठित FIVA World Vehicle Heritage Award मिळाला असून हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय कार ठरली आहे. 1983 मध्ये भारतीय मार्केटमध्ये दाखल झालेल्या या छोट्या हॅचबॅकने देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 21 ऐतिहासिक कारमध्ये मारुती 800 ही एकमेव भारतीय कार होती.
1983 मध्ये बदलले भारतीय कार मार्केट
मारुती 800 डिसेंबर 1983 मध्ये भारतात सादर करण्यात आली. त्यावेळी देशात वैयक्तिक कार वापरणाऱ्यांची संख्या कमी होती आणि सामान्य कुटुंबांसाठी कार खरेदी करणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत कॉम्पॅक्ट आकार, परवडणारी किंमत आणि सहज ड्रायव्हिंग यामुळे मारुती 800 घराघरात लोकप्रिय झाली.
ही कार सुझुकी मोटर कॉर्पोरेशन आणि भारत सरकार यांच्या भागीदारीत तयार करण्यात आली होती. या भागीदारीची सुरुवात 1982 मध्ये झाली. मारुती 800 चे मूळ डिझाइन जपानमधील सुझुकी SS80 मॉडेलवर आधारित होते.
भारत मोबिलिटी एक्स्पो 2027 मध्ये मारुती सुझुकीच्या 2 नवीन कारचा ग्लोबल डेब्यू होण्याची शक्यता!
30 वर्षांत तयार झाल्या 29 लाखांहून जास्त कार
मारुती 800 च्या सुरुवातीच्या प्रोडक्शनसाठी दरवर्षी 40,000 कार तयार करण्याची कॅपसिटी ठेवण्यात आली होती. पण या कारला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तिचे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात वाढले. तब्बल 3 दशकांपर्यंत ही कार तयार करण्यात आली आणि या काळात 29 लाखांहून जास्त युनिट्सचे प्रोडक्शन झाले.
या कारमुळे भारतात स्थानिक ऑटोमोबाईल पार्ट्स उद्योगालाही चालना मिळाली. भारतीय कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या वाहनांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता जगासमोर आणण्यातही तिचा वाटा होता.
युरोपमध्येही मारुती 800 ची निर्यात
1987 मध्ये मारुती 800 ची युरोपमध्ये निर्यात सुरू झाली. हंगेरी, फ्रान्स आणि बेल्जियम हे सुरुवातीचे देश होते. यामुळे भारतीय कार उत्पादन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यास मदत झाली.
FIVA म्हणजेच Fédération Internationale des Véhicules Anciens ही ऐतिहासिक वाहनांचे जतन करणारी आंतरराष्ट्रीय NGO संस्था आहे. ही संस्था युनेस्कोसोबतही भागीदार म्हणून कार्य करते. या पुरस्कारातून केवळ महागड्या किंवा दुर्मिळ कारच नव्हे, तर सामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या वाहनांचाही सन्मान केला जातो. आज मारुती सुझुकी दरवर्षी 4 लाखांहून जास्त कार 120 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. त्यामुळे मारुती 800 चा हा सन्मान भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे.
Ans: मारुती 800 ला FIVA World Vehicle Heritage Award मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय कार ठरली आहे.
Ans: मारुती 800 डिसेंबर 1983 मध्ये भारतात सादर करण्यात आली होती. ही कार सुझुकी SS80 मॉडेलवर आधारित होती.
Ans: मारुती 800 च्या 3 दशकांच्या प्रोडक्शन काळात 29 लाखांहून जास्त युनिट्स तयार करण्यात आल्या. 1987 मध्ये या कारची युरोपमध्ये निर्यातही सुरू झाली होती.






