MINI Cooper SE and Paul Smith Edition India Launch (फोटो सौजन्य-AI एआय)
लक्झरी कार मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख असलेल्या MINI India ने भारतीय कस्टमर्ससाठी MINI Cooper SE आणि MINI Paul Smith Edition या कारची प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे. या Electric MINI Cooper सोबतच Paul Smith Edition मध्ये खास डिझाइन आणि इंटरेस्टिंग कलरकोड पाहायला मिळणार आहे. MINI Electric Car खरेदी करण्याची इच्छा असलेल्या कस्टमर्सना देशभरातील कंपनीच्या डीलरशिपमध्ये जाऊन आपली आवड नोंदवता येणार आहे.
MINI Cooper SE मध्ये काय खास?
नवीन MINI Cooper SE India ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या कारमध्ये MINI ची पारंपरिक डिझाइन ओळख कायम ठेवत शहरी प्रवासासाठी योग्य आकार आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनवर भर दिला आहे. या कारमध्ये गो-कार्टसारखा ड्रायव्हिंग अनुभव मिळण्यावरही कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.
विशेष म्हणजे, प्री-लाँच बुकिंगची अनाउन्समेंट करताना कंपनीने या मॉडेलची किंमत आणि बॅटरीसंबंधी टेक्निकल माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे कारची किंमत, रेंज आणि इतर फीचर्स जाणून घेण्यासाठी कस्टमर्सना कंपनीच्या पुढील कन्फर्मेशनचा वाट पहावी लागणार आहे.
Paul Smith Edition मध्ये 3 मॉडेल्सचा समावेश
MINI Paul Smith Edition ही खास एडिशन Cooper S, Convertible आणि Cooper SE अशा 3 मॉडेल्समध्ये सादर केली जाणार आहे. ब्रिटिश डिझायनर पॉल स्मिथ यांच्या सहकार्याने या कारमध्ये ‘Classic with a Twist’ ही संकल्पना वापरण्यात आली आहे. या एडिशनमध्ये बाहेरील आणि आतील बाजूस मिळून 20 पेक्षा जास्त खास डिझाइन बदल करण्यात आले आहेत.
या कारमध्ये Statement Grey, Inspired White आणि Midnight Black Metallic असे 3 रंग मिळतील. Statement Grey हा रंग 1959 मधील मूळ Mini Austin Seven च्या रंगावरून प्रेरित आहे. Inspired White हा जुन्या Classic Mini Beige रंगाची आठवण करून देतो. तर Midnight Black Metallic हा MINI च्या सध्याच्या रंगसंगतीमधील रंग आहे.
महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर
भारतात 18 विक्री केंद्रे, 51 सर्व्हिस टचपॉइंट्स
MINI India चे सध्या 17 शहरांमध्ये 18 विक्री केंद्रांचे नेटवर्क आहे. यात दिल्ली-एनसीआर, मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, कोची, अहमदाबाद, कोलकाता, लखनऊ, गुवाहाटी, रांची, सुरत, जयपूर आणि जोधपूर या शहरांचा समावेश आहे.
याशिवाय BMW ग्रुप इंडियाच्या नेटवर्कच्या मदतीने MINI ला 36 शहरांमध्ये 51 सर्व्हिस टचपॉइंट्सचे पाठबळ मिळते. त्यामुळे नवीन MINI कार खरेदी करणाऱ्या कस्टमर्सना विक्रीनंतरच्या सर्व्हिससाठीही नेटवर्कचा फायदा घेता येईल.
Ans: होय, MINI India ने नवीन इलेक्ट्रिक Cooper SE साठी देशभरातील डीलरशिपमध्ये प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे.
Ans: ही खास एडिशन MINI Cooper S, MINI Convertible आणि MINI Cooper SE अशा 3 मॉडेल्समध्ये सादर केली जाणार आहे.
Ans: या एडिशनमध्ये Statement Grey, Inspired White आणि Midnight Black Metallic असे 3 रंगांचे ऑप्शन मिळणार आहेत.






