फोटो सौजन्य: Social Media
मारुती सुझुकीच्या कार भारतीय बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय आहेत. कंपनी विविध प्रकारच्या कारांची ऑफर देते, ज्यात हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही आणि एमपीव्हीचा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या कारांची लोकप्रियता मुख्यतः त्याच्या मायलेज आणि मेंटेनन्सच्या कमी खर्चामुळे आहे. कार खरेदी करणारे ग्राहक खर्चाची जाणीव ठेवून, या कारना अधिक प्राधान्य देतात.
मारुती सुझुकीच्या कार अतिशय इंधन कार्यक्षम असतात, ज्यामुळे मोठ्या अंतरावर देखील कमी इंधन खर्च होतो. तसेच, कंपनीच्या कारांचा मेंटेनन्स खर्च कमी असतो, जे सामान्य ग्राहकांसाठी महत्वाचे ठरते. याशिवाय, मारुती सुझुकीच्या कारांना चांगला रीसेल मूल्य मिळतो, ज्यामुळे त्यांचे लाँग-टर्म इन्व्हेस्टमेंट जास्त फायदेशीर ठरते. ग्राहकांसाठी विस्तृत सेवेची उपलब्धता, कंपनीच्या गाड्यांचे विविध मॉडेल्स आणि त्यांच्या किफायतशीर किंमतींमुळे, मारुती सुझुकी भारतीय कार बाजारात एक महत्वाचा ब्रँड बनला आहे.
फक्त 1 लाखात भारताची Most Selling Car होईल तुमची, फक्त दरमहा द्यावा लागेल ‘एवढा’ EMI
मारुतीची बलेनो देखील देशात खूप लोकप्रिय आहे. ही कार भारतीय बाजारात सिग्मा, डेल्टा, डेल्टा सीएनजी, डेल्टा एएम, टी झेटा, झेटा सीएनजी, झेटा एएमटी आणि अल्फा यासह ९ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. चला या कारच्या किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
जर तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण या कारच्या EMI बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, बलेनोची एक्स-शोरूम किंमत 6.71 लाख रुपये ते 9.93 लाख रुपये आहे. या कारच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 7.61 लाख रुपये आहे.
जर तुम्ही 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह बेस मॉडेल खरेदी केले तर 9.8 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी कारचा ईएमआय सुमारे 10,903 रुपये असेल. हे आकडे ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार आहे. परंतु, जर तुम्ही EMI वर कार खरेदी करणार असाल तर तुमचे बजेट आणि EMI एकदा स्वतः तपासले पाहिजे.
Skoda Kodiaq भारतीय बाजारात लवकरच होणार लाँच, Toyota आणि MG सोबत असेल स्पर्धा
या कारच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, Apple CarPlay आणि Android Auto सह 9-इंचाची स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, OTA अपडेट्स, Arkamys-सोर्स्ड म्युझिक सिस्टम, हेड-अप डिस्प्ले (HUD), क्रूझ कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. तुम्हाला हाइट -अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 6 एअरबॅग्ज देखील मिळतील. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बहुतेक फीचर्स फक्त टॉप मॉडेल किंवा अपर व्हेरियंटमध्येच दिले जातात.