खिशाला परवडणारी उत्तम कार वाचा वैशिष्ट्य (फोटो सौजन्य - Carwale)
जर तुम्ही भारतातील सर्वात शक्तिशाली ७ सीटर कार शोधत असाल जी खूप कमी बजेटची आहे आणि त्याचबरोबर उत्तम जागा आणि वैशिष्ट्येदेखील देते, तर आज आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत. ही कार प्रत्येक MPV प्रेमींसह तुम्हाला हमखास पाहता येईल. ही एमपीव्ही अत्यंत शक्तिशाली आहे आणि भारतात खूप लोकप्रिय आहे.
आज आम्ही तुम्हाला त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की ही ७ सीटर कार आहे तरी कोणती? हो हो जरा थांबा आणि या लेखात त्याची वैशिष्ट्ये आणि नावदेखील वाचा. इतकंच नाही तर याची किंमत वाचून तुम्ही त्वरीत कार घ्यायचा प्लॅन करायला घ्याल हे मात्र नक्की!
कोणती आहे ही MPV
आपण ज्या एमपीव्हीबद्दल बोलत आहोत ती भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात लोकप्रिय सात सीटर कार आहे ज्याचे नाव मारुती एर्टिगा आहे, जी परवडणाऱ्या श्रेणीत उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. मारूती अर्टिगा ही अत्यंत क्लासी आणि त्यासह अनेकांना खिशाला परवडणारी कार आहे. ही ७ सीटर तुमच्याकडे असावी असं वाटत असेल तर अगदी १० लाखापेक्षा कमी किमतीत तुम्ही ही कार खरेदी करू शकताय.
Revolt BlazeX: भारतात खिशाला परवडणारी इलेक्ट्रॉनिक मोटरसायकलचे लाँच, फुल चार्जवर 150km ची रेंज
इंजिन आणि पॉवर
मारुती सुझुकी अर्टिगामध्ये तुम्हाला १.५ लिटर पेट्रोल इंजिन पर्याय मिळतो, जो १०२bhp पॉवर आणि १३७Nm टॉर्क निर्माण करतो. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटशी जोडले जाऊ शकते. सीएनजी इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे आणि ते ८७ बीएचपी पॉवर आणि १२१.५ एनएम टॉर्क निर्माण करते. त्यामुळे ही जास्त काळ तुमच्या सोबत राहू शकते.
किती आहे किंमत
मारुती सुझुकी अर्टिगाची किंमत ८,८४,००० रुपयांपासून सुरू होते आणि टॉप ट्रिम ZXi Plus AT साठी १३,१३,००० रुपयांपर्यंत जाते. ही मारुती सुझुकी एर्टिगा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi यांचा समावेश आहे. यासोबतच, कंपनीने ते ७ वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केले आहे.
मारुती सुझुकी अर्टिगा किआ कॅरेन्स, रेनॉल्ट ट्रायबर आणि ह्युंदाई अल्काझारशी स्पर्धा करताना दिसून येत आहे. मात्र सध्या बाजारात अधिकाधिक चर्चा मारुती अर्टिगाची आहे आणि ग्राहकही याकडे अधिक आकर्षित होताना दिसून येत आहे आणि त्याचे कारण त्याची किंमत आणि मिळणाऱ्या सुविधा आहेत हे मात्र नक्की!
Honda Elevate ला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद, कंपनीने ‘या’ कारची केली रेकॉर्ड ब्रेक विक्री