
फोटो सौजन्य: Pinterest
मारुती व्हिक्टोरिस ही कार अलीकडेच कंपनीने मिड साइझ एसयूव्ही म्हणून लाँच केली होती. रिपोर्टनुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये या एसयूव्हीला खूप मागणी होती. चला याबद्दल जाणून घेऊयात.
MG Hector मार्केट गाजवणार भाऊ! लाँच होण्याअगोदरच टिझर रिलीज, ‘या’ दिवशी होणार लाँच
अलीकडेच मारुतीने Victoris ही मिड साइझ एसयूव्ही म्हणून लाँच केली आहे. लाँच झाल्यापासून, ही एसयूव्ही लोकप्रिय पसंती बनली आहे, दरमहा हजारो युनिट्सची विक्री होते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 12300 युनिट्स विकले गेले. म्हणजेच सरासरी दररोज या एसयूव्हीच्या 400 पेक्षा जास्त युनिट्सची डिलिव्हरी केली जात आहे.
या एसयूव्हीमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहे. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड रियर टेललाइट्स, शार्क फिन अँटेना, 26.03 सेमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर-बॉडी सीएनजी किट, डॉल्बी अॅटमॉस सिस्टम, जेश्चर-कंट्रोल्ड टेलगेट, अँबियंट लाइटिंग, अलेक्सा ऑटो व्हॉइस असिस्टंट, 35 हून अधिक कनेक्टेड फीचर्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांचा समावेश आहे. इंटीरियर काळ्या, राखाडी आणि चांदीच्या रंगात पूर्ण केले आहे.
या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज आणि लेव्हल-२ एडीएएस सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही
Maruti Victoris मध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन दिले आहे. यामुळे या कारला 75.8 kW ची पॉवर आणि 139 Nm टॉर्क मिळतो. याशिवाय ही एसयूव्ही स्ट्रॉंग हायब्रिड आणि CNG पर्यायांसह उपलब्ध आहे.
या कारची सुरवातीची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19.98 लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुती व्हिक्टोरिसला बाजारात मिड-साइज एसयूव्ही म्हणून सादर केले जाते. या सेगमेंटमध्ये ही कार थेट Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Tata Sierra, Volkswagen Taigun सारख्या एसयूव्हींशी स्पर्धा करते.