फोटो सौजन्य: X.com
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत. अशीच एक ऑटो कंपनी म्हणजे Maruti Suzuki. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. आता तर इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा कंपनीने नवीन कार लाँच केली आहे. बदलत्या काळानुसार कंपनी त्यांच्या कारमध्ये सुद्धा बदल करून त्याचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणत असतात.
मारुती सुझुकी भारतीय ऑटो बाजारासाठी नवीन हायब्रिड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार म्हणजे दुसरी-तिसरी नसून लोकप्रिय Maruti Fronx Hybrid आहे. ही कार पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या India Mobility Global Expo मध्ये या कारचे संभाव्य डेब्यू होऊ शकते. याशिवाय अलीकडेच Fronx Hybrid ची टेस्टिंगदरम्यान तिची झलक पाहायला मिळाली आहे.
किती वेळ OLA-Uber ने फिरणार? नवीन GST मुळे ‘ही’ कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच
नवीन फ्रॉन्क्स हायब्रिडची किंमत सध्याच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, पेट्रोल व्हर्जनपेक्षा ती सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांनी महाग असू शकते.
सध्या Fronx ची किंमत 7.59 लाख ते 12.95 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. त्यामुळे हायब्रिड व्हेरिएंटची किंमत साधारण 8 लाख ते 15 लाख (एक्स-शोरूम) या दरम्यान असू शकते. या किमतीत ही SUV मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक उत्तम व बजेट-फ्रेंडली पर्याय ठरू शकते.
Maruti Fronx Hybrid मध्ये कंपनीचे नवे 1.2-लिटर Z12E थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे, जे स्ट्रॉन्ग हायब्रिड सिस्टमसोबत काम करेल. हा एक सीरिज हायब्रिड सेटअप असेल, ज्यात पेट्रोल इंजिन बॅटरीला चार्ज करेल आणि इलेक्ट्रिक मोटर थेट चाकांना पॉवर देईल. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे Fronx Hybrid चे मायलेज तब्बल 30-35 किमी/लीटर पर्यंत जाऊ शकते. हे सध्याच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा (20.01–22.89 किमी/लीटर) आणि CNG व्हेरिएंटपेक्षा (28.51 किमी/किलोग्रॅम) खूपच जास्त आहे.
350 CC सेगमेंटमध्ये ‘या’ 2 बाईक म्हणजे कहरच! फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोण मारते बाजी?
मारुती फ्रॉन्क्स हायब्रिडमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स ऑफर करतात. त्यात मोठी 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले (HUD), 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि सनरूफ यांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. कंपनी टॉप मॉडेलमध्ये लेव्हल-1 ADAS देखील समाविष्ट करू शकते, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोपी होईल.
मारुतीने नेहमीच त्याचे सेफ्टी पॅकेज पॅकेज सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. फ्रॉन्क्स हायब्रिड सध्याच्या मॉडेलप्रमाणेच सेफ्टी फीचर्स देईल. यामध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश असू शकतो.