350 CC सेगमेंटमध्ये 'या' 2 बाईक म्हणजे कहरच!
भारतात उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकमध्ये Royal Enfield आणि Honda च्या बाईक लोकप्रिय आहेत. या बाईक दिसण्यात तर पॉवरफुल असतातच. मात्र या शिवाय त्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा पॉवरफुल असतात. जर तुम्ही 350 सीसी सेगमेंटमध्ये बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Royal Enfield Hunter 350 आणि Honda CB 350 Dlx तुमच्यासाठी बेस्ट बाईक असेल. मात्र या दोन्ही बाईकमध्ये बेस्ट बाईक कोणती? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रॉयल एनफिल्ड हंटर 350 मध्ये 349 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. या सिंगल सिलेंडर इंजिनमधून 20.2 बीएचपीची पॉवर आणि 27 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. यासोबत पाच स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
तर होंडा CB 350 मध्ये 348.36 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमधून 15.5 किलोवॅटची पॉवर आणि 29.5 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. यासोबतही पाच स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
वाह काय ऑफर आहे! ‘या’ कंपनीचे Electric Scooter आता फक्त 50,000 रुपयात घरी आणता येणार
रॉयल एनफील्डने हंटर 350 मध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प दिला गेला आहे. याव्यतिरिक्त, या बाईकमध्ये डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्रिपर पॉड, यूएसबी चार्जिंग पोर्ट, दोन्ही चाकांवर 17-इंच डिस्क ब्रेक, ड्युअल-चॅनल एबीएस, 6-स्टेप ॲडजस्टेबल शॉक अॅब्झॉर्बर आणि फ्लॅशिंग इंडिकेटर आहेत.
दरम्यान, होंडा सीबी 350 मध्ये ड्युअल-चॅनल एबीएस, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, 18- आणि 19-इंच टायर्स, ईएसएस टेक्नॉलॉजी, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टर्न सिग्नल, फ्लॅशिंग इंडिकेटर, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्प्लिट सीट आणि इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड यासारख्या फीचर्ससह येते.
‘या’ कंपनीच्या कारसाठी विदेशी ग्राहक पागल! चक्क भारतातून 2 लाख युनिट्स निर्यात
रॉयल एनफील्ड हंटर 350 ग्रेफाइट ग्रे, टोकियो ब्लॅक, लंडन रेड, रिबेल ब्लू, डॅपर ग्रे, रिओ व्हाइट आणि फॅक्टरी ब्लॅकमध्ये देते.
होंडा सीबी 350 ही पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट अॅक्सिस ग्रे, पर्ल डीप ग्राउंड ग्रे, मॅट ड्यून ब्राउन आणि रिबेल रेड मेटॅलिक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
रॉयल एनफील्ड हंटर 350 ची सुरुवात 1.37 लाख (एक्स-शोरूम) पासून होते. टॉप व्हेरिएंटची किंमत 1.66 लाख (एक्स-शोरूम) आहे.
होंडा सीबी 350 देखील 1.64 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. टॉप व्हेरिएंटची किंमत 2 लाख (एक्स-शोरूम) आहे.