फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. ज्यामुळे ग्राहकांमध्ये देखील या कंपन्यांबद्दल एक विश्वास असतो. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे मारूती सुझुकी. भारतात अनेक वर्षांपासून मारुती ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार उत्तम बजेट फ्रेंडली कार ऑफर करत आहेत. यामुळे कंपनीचा सेल्स रिपोर्ट देखील चांगला होत आहे. पण असे जरी असले तरी कंपनी आपल्या एका एक कारचे उत्पादन बंद करत आहे. तसेच या कारचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी यावर डिस्काउंट देखील देत आहे.
अंबानी-शाहरुखकडे असणारी कार Urvashi Rautela च्या ताफ्यात, किंमत तब्बल 12 कोटी !
मारुतीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात कमी विक्री होणाऱ्या कारच्या यादीत Ciaz चे देखील नाव आहे. आता कंपनी या महिन्यात या सेडानवर 45,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. सियाझच्या विक्रीचे आकडे कंपनीसाठी खूपच वाईट झाले आहेत. या कारणास्तव कंपनी एप्रिलमध्ये ही कार बंद करणार आहे. या महिन्यात कंपनी या कारवर 10,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट आणि 30,000 रुपयांपर्यंत स्क्रॅपेज बोनस देत आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.42 लाख रुपये आहे.
वाहनचालकांनो टेन्शन घ्यायची गरज नाही ! ‘या’ वाहनांना HSRP नंबरप्लेट अजिबात अनिवार्य नाही
मारुती सियाझचे एकूण 7 व्हेरियंट आहेत. यामध्ये सिग्मा, डेल्टा, डेल्टा एटी, झेटा, झेटा एटी, अल्फा आणि अल्फा एटी यांचा समावेश आहे. अधिकृत वेबसाइटवर फक्त पहिल्या 2 ट्रिम्स सिग्मा, डेल्टा, डेल्टा एटीच्या किमती दिसतात. तर, झेटा, झेटा एटी, अल्फा आणि अल्फा एटीच्या किमती दिसत नाही आहेत.
मारुती सुझुकीने फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या सेडान सियाझमध्ये नवीन सेफ्टी अपडेट्स सादर केले होते. कंपनीने या कारमध्ये 3 नवीन ड्युअल टोन रंग दिले आहेत. उपलब्ध ड्युअल टोन रंग पर्यायांमध्ये ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ओप्युलंट रेड, ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रँड्योर ग्रे आणि डिग्निटी ब्राउन यांचा समावेश आहे. नवीन व्हेरियंट मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
कंपनीने सियाझच्या नवीन व्हेरियंटच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात जुने 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असेल, जे 103bhp पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 -स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की या कारचे मॅन्युअल व्हर्जन 20.65 किमी/लीटर पर्यंत मायलेज देते आणि ऑटोमॅटिक व्हर्जन 20.04 किमी/लीटर पर्यंत मायलेज देते.