फोटो सौजन्य: urvashirautela (instagram)
भारतीय बाजारात बजेट फ्रेंडली कारला मोठी मागणी जरी असली तरी लक्झरी कारची क्रेझ सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ही क्रेझ फक्त सर्वसामान्यांमध्ये नसून मोठ्या सेलिब्रेटी मंडळींमध्ये देखील आहे. म्हणूनच तर प्रत्येक सेलिब्रेटींच्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार पाहायला मिळते. हीच क्रेझ पाहता अनेक ऑटो कंपन्या भारतात लक्झरी कार ऑफर करत असतात.
नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आलिशान कार विकत घेतली आहे. दुसरी बाब म्हणजे ही कार अंबानी कुटुंबीय आणि बॉलिवूडच्या किंग खानकडे देखील नाही. चला जाणून घेऊया की उर्वशी रौतेलाने कोणती नवीन कार खरेदी केली आहे.
वाहनचालकांसाठी राज्य सरकारचा दिलासा ! HSRP नंबरप्लेटबाबत घेतला महत्वाचा निर्णय
भारतीय अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने एक अद्भुत आलिशान कार रोल्स-रॉइस कलिनन खरेदी केली आहे. ही कार खरेदी करणारी उर्वशी ही पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. उर्वशी रौतेलाच्या आधी भारतात फक्त सहा जणांनी ही कार खरेदी केली आहे. यामुळे या अभिनेत्रीचे नाव भारतातील रोल्स-रॉइस कलिनन मालकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
उर्वशी रौतेलाच्या रोल्स-रॉइस कलिननची सर्वत्र चर्चा होत आहे. रिपोर्ट्सनुसार, या रोल्स-रॉइस कलिननची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे. उर्वशीच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टमध्येही ही कार दिसू शकते. रोल्स-रॉइस कलिनन ही अनेक लक्झरी फीचर्सने सुसज्ज अशी कार आहे. रोल्स-रॉइस कलिननमध्ये 6750 सीसी इंजिन आहे. कारमधील हे इंजिन 5,000 आरपीएमवर 563 बीएचपी पॉवर जनरेट करते आणि 1,600 आरपीएमवर 850 एनएम टॉर्क जनरेट करते.
2015 मध्ये उर्वशी रौतेलाने मिस डिवा -मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब जिंकला. तेव्हापासून उर्वशीचे नाव संपूर्ण इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाले. अलीकडेच उर्वशी रौतेलाचा इन्स्टाग्रामच्या फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत फक्त अशाच लोकांचा समावेश आहे ज्यांचा लोकांवर मोठा प्रभाव आहे आणि ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवले आहे.
Tata Punch ने गमावले नंबर 1 चे स्थान, ‘या’ 8 लाखाच्या SUV ने चारली धूळ
उर्वशी रौतेला ही देशातील एकमेव महिला आहे जिच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स-रॉइस कलिननचा समावेश आहे. याआधी सहा भारतीयांनीही ही कार खरेदी केली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे कलिननसह अनेक रोल्स-रॉइस कार आहेत. शाहरुख खानच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स-रॉइस कलिनन ब्लॅक बॅजचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेते विवेक ओबेरॉय आणि अजय देवगण यांच्याकडेही ही कार आहे. पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुननेही ही कार खरेदी केली आहे. टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांच्या कलेक्शनमध्ये रोल्स-रॉइस कलिननचाही समावेश आहे.