
फोटो सौजन्य: Gemini
मारुती सुझुकीने सुद्धा त्यांच्या अनेक कार सीएनजी पर्यायसह बाजारात आणल्या आहेत. मार्केटमध्ये Maruti Suzuki Baleno च्या सीएनजी व्हर्जनला सुद्धा चांगली मागणी मिळतेय. जर तुम्ही या प्रीमियम हॅचबॅकचा सीएनजी व्हेरिएंट खरेदी करण्याच्या विचार करत असाल, तर 2 लाखांच्या डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला दरमहा किती रुपयांचा EMI भरावा लागेल त्याबद्दल जाणून घेऊयात.
जून 2026 पर्यंत Nissan Tekton होऊ शकते लाँच! डिझाइन मस्क्युलर आणि फीचर्स एकदम किलर
मारुती बलेनोच्या सीएनजी व्हेरिएंट Delta ऑफर करते. कंपनी ही कार 7.70 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर करते. तुम्हाला 7.70 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत नोंदणी आणि विमा शुल्क समाविष्ट असेल. या वाहनासाठी अंदाजे 54 हजार रजिस्ट्रेशन टॅक्स आणि अंदाजे 41 हजार रुपयांचा विमा शुल्क आकारला जाईल. यामुळे दिल्लीमध्ये वाहनाची ऑन-रोड किंमत 8.64 लाखांवर पोहोचते.
तुम्ही Maruti Baleno चा CNG व्हेरिएंट (Delta) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँक एक्स-शोरूम किमतीवरच तुमहाला कर्ज देईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित सुमारे 6.64 लाख रुपये बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घ्यावी लागेल.
जर बँकेने 9% व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 6.64 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा सुमारे 10,806 रुपयांचा EMI भरावा लागेल.
पहिल्यांदाच Mahindra XUV 7XO मध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स, ‘या’ दिवशी पहिली झलक येणार समोर
9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 6.64 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास, तुम्ही दरमहा 10,806 रुपयांचा EMI भराल. या कालावधीत एकूण सुमारे 2.42 लाख रुपये केवळ व्याजाच्या स्वरूपात भरावे लागतील. परिणामी, Maruti Baleno CNG Delta व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून कारची एकूण किंमत अंदाजे 11.07 लाख रुपये इतकी होईल.