फोटो सौजन्य: @Xroaders_001(X.com)
भारतात अनेक उत्तम फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच होताना दिसत आहे. पण असे जरी असले तरी मार्केटमध्ये अशाही कार्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या विक्रीवर या नवीन कार्सच्या येण्यामुळे काहीच फरक पडला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Maruti Suzuki Dzire.
भारतीय कार मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून आपली खास ओळख निर्माण करणारी मारुती सुझुकी डिझायर आजही ग्राहकांची पहिली पसंत आहे. 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह येणारी ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडान्सपैकी एक आहे. मार्केटमध्ये अनेक एसयूव्हींनी वर्चस्व गाजवले असले तरी मार्च 2025 मध्ये टॉप-10 विक्री यादीत डिझायर एकमेव सेडान ठरली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये डिझायरची एकूण 15,460 युनिट्स विकली गेली. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 3 टक्क्यांनी कमी असली, तरी सेडान सेगमेंटमध्ये ती आघाडीवर कायम आहे.
नवीन डिझायरचे डिझाइन पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक स्टायलिश आणि आकर्षक झाले आहे. मोठी फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लॅम्प्स आणि 15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील्समुळे या कारच्या लूकला एक प्रीमियम टच मिळतो.
डिझायरमध्ये अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. 9 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह येते. वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स आणि स्मार्ट की यांसारखी फीचर्स ही कार अधिक आरामदायक बनवतात.
ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये डिझायरला कौटुंबिक सुरक्षेसाठी 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. या सेगमेंटमध्ये ही एक मोठी गोष्ट मानली जाते. यामध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट आणि रियर पार्किंग सेन्सर्स यांसारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
डिझायरने मायलेजच्या बाबतीत नेहमीच बाजी मारली आहे. मॅन्युअल व्हेरियंट 24.79 किमी/लि. पर्यंत तर ऑटोमॅटिक व्हर्जन 25.71 किमी/लि. पर्यंत मायलेज देते. हे आकडे केवळ कागदावरच नाही, तर प्रवाशांच्या अनुभवावर आधारितही आहेत.
डिझायरची एक्स-शोरूम किंमत 6.84 लाख रुपयांपासून सुरू होऊन 10.19 लाख रुपयांपर्यंत जाते. मायलेज, फीचर्स आणि सुरक्षिततेचा विचार करता, ही कार “व्हॅल्यू फॉर मनी” नक्कीच ठरते. पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांसाठी डिझायर एक चांगली निवड ठरू शकते.