
Maruti Suzuki Dzire,
मारुती सुझुकीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये १५ हजार युनिट्सचा टप्पा पार केला. त्यानंतर पूर्ण वर्षभर विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल २०२५ मध्ये विक्री जवळपास १७ हजार युनिट्सपर्यंत पोहोचली. तर मे महिन्यात ती १८ हजारच्या पुढे गेली. दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात विक्रीने २० हजारांचा आकडा ओलांडला. ऑकटोम्बरमध्ये २० हजार ७९१ तर नोव्हेम्बरमध्ये हा आकडा २१ हजार ८२ युनिट्सपर्यंत पोहोचला. डिसेंबर महिन्यातही १९ हजार पेक्षा अधिक युनिट्सची विक्री कायम राहिली.
Maruti Suzuki Dzire ही Maruti Suzuki ची भारतातील खूप लोकप्रिय कॉम्पॅकट सेडान कार आहे. ही कार विशेषतः चांगला मायलेज, कमी मेंटेनन्स आणि फॅमिली कम्फर्ट साठी ओळखली जाते.
Maruti Suzuki Dzire हि लोकप्रिय ठरण्यामागची कारणे म्हणजे तिचे आकर्षक फीचर्स. आकर्षक नवीन डिजाईन आणि LED हेडलॅम्प, ९ इंच टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कारप्ले, इलेक्ट्रिक सनरूफ, रिअर एसी व्हेंट्स आणि मोठा आणि कम्फर्टेबल केबिन हे खास फीचर्स या गाडीत आहेत. याशिवाय Dzire मध्ये 1.2L Z-Series पेट्रोल इंजिन मिळतो. यात सीएनजी व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. कंपनीनुसार Petrol Manual: सुमारे 24.79 kmpl, AMT: सुमारे 25.71 kmpl आणि CNG: सुमारे 33.73 km/kg चा मायलेज मिळतो. यात सेफ्टी फीचर्स सुद्धा उत्तम आहेत. नवीन Dzire ला 5-star सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. सेफ्टी फीचर्स म्हणून यात ६ एअरबॅग्स, एबीएस सिस्टम, हिल होल्ड असिस्ट, ISOFIX child seat mounts उपलब्ध आहेत. ही कार खास करून रोजच्या ऑफिस वापरासाठी, कुटुंबासोबत ट्रॅव्हल साठी, जास्त मायलेज हव्या असणाऱ्यांसाठी आणि कमी मेंटेनन्स बजेट असणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय मानला जातो.
भारतीय बाजारात SUV, टू व्हिलर्स च्या विक्रीत एप्रिल महिन्यात मोठी वाढ