फोटो सौजन्य: Social Media
आजपासून देशातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह इव्हेंटची सुरुवात झाली आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 असे या ऑटो कार्यक्रमाचे नाव आहे. या कार्यक्रमाला ऑटो एक्स्पो 2025 या नावाने देखील ओळखले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले आहे.
या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला. तसेच अनेक आगामी कार आणि बाईक्स आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. त्यातीलच एका आधुनिक कारचे नाव म्हणजे Maruti Suzuki e Vitara.
मारुती सुझुकी आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यास सज्ज झाली आहे. कंपनीने टोयोटासोबतच्या सहकार्याने या कारचे हार्टेक्ट-ई प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. ई-विटारामध्ये ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमसह अनेक बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मारुती सुझुकी ई-विटाराची रेंज किती असेल आणि त्यात कोणत्या फीचर्स पाहायला मिळतील याबद्दल जाणून घेऊया.
अलीकडेच या कारचा टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये त्याचे एक्सटिरिअर डिझाइन दिसून आले. यात ट्राय-स्लॅश एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि मध्यभागी मारुती सुझुकीचा लोगो आहे. यासोबतच, एक स्कल्प्टेड बोनेट आणि एक ठळक बंपर देखील दिसत आहे.
या कारच्या मागील आणि बाजूच्या प्रोफाइलबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 18-इंच अलॉय व्हील्स, सी-पिलर-माउंटेड डोअर हँडल, व्हील आर्च क्लॅडिंग, रूफ स्पॉयलर, शार्क-फिन अँटेना, मजबूत मागील बंपर आणि लाईटबार-शैलीतील टेल लॅम्प आहेत.
Mahindra Thar Roxx ची किंमत भिडली गगनाला, ‘इतक्या’ रुपयांनी महाग झाली कार
मारुती सुझुकी ई-विटाराच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, त्यात इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम इंटिग्रेटेड स्क्रीन दिसते. या कारचा डॅशबोर्ड ड्युअल-टोन इंटीरियरसह दिला जाऊ शकतो. यात दोन-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टेअरिंग व्हील आणि अपडेटेड एसी व्हेंट्स देखील असू शकतात, जे त्याची कार्यक्षमता आणि डिझाइन आणखी वाढवेल.
मारुती सुझुकी ई विटारामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये आढळू शकतात. त्याच वेळी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 एडीएएस (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) उपलब्ध असू शकते.
मारुती सुझुकी ई-विटारा टोयोटाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. त्यात दोन बॅटरी पॅक असतील, जे 49 किलोवॅट प्रति तासाचे पॅक आणि 61 किलोवॅट प्रति तासाचे आहेत. त्याची मोटर टू-व्हील किंवा फोर-व्हील ड्राइव्हसह जोडली जाऊ शकते. त्याच्या बॅटरी रेंजबद्दल बोलायचे झाले तर ही कार पूर्ण चार्ज केल्यानंतर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल याची पुष्टी झाली आहे.
मारुती सुझुकीचे म्हणणे आहे की बॅटरी पॅकचे वजन 600 ते 700 किलो दरम्यान आहे. बॅटरीचे वजन कमी असल्याने, कारची क्षमता आणि लॉंग ड्रायव्हिंग रेंज महत्त्वाची भूमिका बजावेल.