फोटो सौजन्य: Social Media
नवीन वर्षात अनेक जण नवीन कार घेण्याचे प्लॅन्स बनवत असतात. अशातच अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिस्सा आता अधिकच रिकामा होणार आहे. यातच आता महिंद्राने सुद्धा आपल्या लोकप्रिय कारच्या किंमती वाढवण्याचा विचार केला आहे.
भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा कडून ऑफर केलेल्या महिंद्रा थार रॉक्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. जानेवारी 2025 मध्ये कंपनीने एसयूव्हीची किंमत किती हजारांनी वाढवली आहे? कोणत्या व्हेरियंटच्या किंमतीत जास्तीत जास्त वाढ करण्यात आली आहे?. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
महिंद्राने ऑफर केलेली महिंद्र थार रॉक्स खरेदी करणे आता महाग झाले आहे. कंपनीने जानेवारी 2025 मध्ये या एसयूव्हीच्या किंमती वाढवल्या आहेत. परंतु, सर्वच व्हेरियंटच्या किंमती वाढवल्या गेल्या नाहीत.
2024 मधील अशा कार ज्यांच्याकडे ग्राहकांनी ढुंकूनही पाहिले नाही, 2025 मध्ये कसा असेल परफॉर्मन्स?
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने एसयूव्हीची किंमत जास्तीत जास्त 60 हजार रुपयांनी वाढवली आहे. सर्वात कमी वाढ 10 हजार रुपयांची झाली आहे.
कंपनीने पेट्रोल इंजिन असलेल्या टॉप व्हेरियंट AX7 L AT ची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. जे जुन्या किंमतीच्या तुलनेत 2.50 टक्के आहे. याशिवाय, एसयूव्हीच्या डिझेल इंजिन MX5 MT 4X4 व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 30 हजार रुपयांनी वाढली आहे, AX5 L AT 4X4 ची किंमत 10 हजार रुपयांनी वाढली आहे, AX7 L एटीमध्ये 50 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
आता पार्किंग नाही तर कार नाही ! महाराष्ट्रात लवकरच लागू होणार ‘हा’ नियम?
ज्या व्हेरियंटच्या किंमती सर्वात जास्त वाढवल्या गेल्या आहेत, त्यात AX7 L MT 4X4 आणि AX7 L AT 4X4 यांचा समावेश आहे. या दोन्ही व्हेरियंटच्या किमतींमध्ये 60 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
किंमत वाढण्यापूर्वी, पेट्रोल इंजिनसह AX7 L AT व्हेरियंटची किंमत 19.99 लाख रुपये होती, परंतु आता त्याची किंमत 20.49 लाख रुपये झाली आहे.
डिझेल इंजिनसह MX5 MT 4X4 व्हेरियंटची किंमत 18.79 लाख रुपयांऐवजी 19.09 लाख रुपये, AX5 L AT 4X4 व्हेरियंटची किंमत 20.99 लाख रुपयांऐवजी 21.09 लाख रुपये, AX7 L MT व्हेरियंटची किंमत 18.99 रुपयांऐवजी 19.49 लाख रुपये, AX7 L AT व्हेरियंटची किंमत 20.49 लाख रुपये, AX7 L MT 4X4 व्हेरियंट 20.99 लाख रुपयांऐवजी 21.59 लाख रुपयांना आणि AX7 L AT 4X4 व्हेरियंट 22.49 लाख रुपयांऐवजी 23.09 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे.