फोटो सौजन्य: www.nexaexperience.com
नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या कार्सची किंमत वाढवण्याचे निर्णय घेतले होते. साहजिकच या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला बसत आहे. आता देशातील प्रमुख आणि आघाडीची कार उत्पदक कंपनी मारुती सुझुकीने देखील ग्रँड विटाराची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील आघाडीच्या वाहन निर्मात्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीकडून त्यांच्या एसयूव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय मॉडेल ग्रँड विटाराच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ही किंमतवाढ 8 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे. मारुती ग्रँड विटाराच्या विविध व्हेरियंट्सच्या किंमतीत किती वाढ झाली आहे आणि आता त्या कोणत्या नव्या किमतीत उपलब्ध आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कमीत कमी किती डाउन पेमेंट केल्यास Range Rover Velar होईल तुमची? असा असेल EMI चा हिशोब
मारुती सुझुकीने अलीकडेच त्यांच्या चार मीटरपेक्षा मोठी एसयूव्ही ग्रँड विटारामध्ये काही अपडेट्स केले असून, त्यासोबतच वाहनाच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.
ग्रँड विटाराच्या बेस व्हेरियंटसाठी Sigma हे मॉडेल उपलब्ध असून, त्याची किंमत आता 23000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. किंमत वाढण्यापूर्वी या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.19 लाख रुपये होती. मात्र आता ही एसयूव्ही 11.42 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मिळणार आहे.
डेल्टा ही एसयूव्हीची दुसरी बेस व्हेरियंट म्हणून विकली जाते. या व्हेरियंटची जुनी किंमत 12.30 लाख रुपये होती, पण आता ती 12.53 लाख रुपयांपासून सुरू होईल. अशा परिस्थितीत या कारची किंमतही 23 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
या एसयूव्हीचा झेटा व्हेरियंट यापूर्वी 14.26 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध होता. किंमत वाढल्यानंतर, त्याची एक्स-शोरूम किंमत 14.67 लाख रुपये झाली आहे. या व्हेरियंटची किंमत 41 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
अल्फा ही या एसयूव्हीची टॉप व्हेरियंट म्हणून विकली जाते. या व्हेरियंटची जुनी एक्स-शोरूम किंमत 15.76 लाख रुपये होती. पण आता ती फक्त 16.14 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 38 हजार रुपयांनी वाढली आहे.
ग्रँड विटारा एसयूव्ही मारुती सुझुकीने चार मीटरपेक्षा मोठ्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार Toyota Urban Cruiser Hyryder, Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.