फोटो सौजन्य; @V8Cult (X.com)
भारतीय मार्केटसोबतच जागतिक मार्केटमध्ये देखील इलेक्ट्रिक कार्सची मागणी देखील जोर धरू लागली आहे. पूर्वी ज्या कंपन्या इंधनावर चालणाऱ्या कार्स बनवत होत्या त्याच आज इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. नुकतेच स्कोडा कंपनीने आपली दमदार आणि वेगवान इलेक्ट्रिक कार ग्लोबल मार्केटमध्ये सादर केली आहे.
स्कोडा कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये त्यांची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘Skoda Elroq RS’ सादर केली आहे. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेल्या कंपनीने या नवीन एसयूव्हीमध्ये 84 किलोवॅट प्रति तास क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. चला या दमदार इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊया.
बजेट 1 लाख रुपये आणि त्यात स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स
नवीन Elroq RS च्या लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने ती सिग्नेचर हायपर-ग्रीन कलर पेंट स्कीमसह सादर केली आहे. याशिवाय, त्यात एलईडी मॅट्रिक्स बीम हेडलाइट, नवीन डिझाइन केलेले कार बंपर, ब्लॅक आउट रूफ रेल, फेंडर्सवर ‘आरएस’ बॅजिंग देण्यात आले आहे. याशिवाय, समोरील बंपरला आकर्षक लूक देण्यासाठी बोनेटवर क्रीज लाईन्स देखील देण्यात आल्या आहेत.
कारच्या साइड प्रोफाइलबद्दल सांगायचे झाले तर, त्यात 21 इंचाचे अलॉय व्हील आहे. हे व्हील विशेषतः ‘RS’ व्हेरियंटसाठी डिझाइन केले आहे. व्हीलबेसच्या वर एक छोटीशी बॉडी मोल्डिंग देखील दिसते, जी काळ्या क्लॅडिंगने सजवलेली आहे. एसयूव्हीच्या मागील बाजूस तेच काळे प्लास्टिकचे आवरण पसरलेले आहे, ज्यामुळे या कारला स्पोर्टी लूक मिळतो.
कंपनीने एल्रोक आरएसच्या मागील बाजूस नवीन डिझाइन केलेला बंपर देखील दिला आहे. मागील विंडशील्डवर काळ्या रंगाचा ‘SKODA’ बॅजिंगसह रूफ स्पॉयलर आहे. त्याचा मागील लूक मॅट्रिक्स स्टाइल एलईडी टेल लॅम्पने पूर्ण झाला आहे. एकंदरीत, ही एसयूव्ही डिझाइनच्या बाबतीत खूपच चांगली आणि आकर्षक आहे.
Hyundai Creta च्या EX व्हेरियंटला घरी आणण्यासाठी 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
या एसयूव्हीमध्ये 84 किलोवॅट प्रति तास क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक आहे. जे प्रत्येक एक्सलवर ड्युअल-इलेक्ट्रिक मोटर सेटअपला पॉवर देते. हे दोन्ही मोटर्स एकत्रितपणे 335 एचपी पॉवर आउटपुट जनरेट करतात. जे ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीमसह एकत्रित केल्याने कारला 5.4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग मिळू शकतो. ज्यामुळे ती सर्वात वेगवान स्कोडा बनते.
स्कोडा दावा करते की या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे. या सर्वांसह, ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 550 किमी ड्रायव्हिंग रेंज देते. या कारची बॅटरी 185 किलोवॅट डीसी फास्ट चार्जर वापरून 26 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते. जर 11 किलोवॅटचा एसी चार्जर वापरला तर तो 0 ते 100 टक्के पर्यंत जाण्यासाठी 8 तास लागतील.