फोटो सौजन्य: iStock
नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्या नवनवीन कार्स लाँच करण्याची तयारी करत आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटो कंपन्या दमदार डिस्कॉउंट्स सुद्धा ऑफर करत आहे. देशाची आघीडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी January 2025 मध्ये नेक्सा डिलरशिपद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या कार्सवर डिस्कॉउंट्स देत आहेत. चला जाणून घेऊया, कोणत्या कारवर किती डिस्कॉउंट्स मिळत आहे.
जानेवारी 2025 मध्ये, मारुती त्यांच्या बलेनोवर हजारो रुपयांच्या डिस्कॉउंट्सच्या ऑफर देत आहे. या महिन्यात ही हॅचबॅक कार खरेदी केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त 62 हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो. ही ऑफर त्यांच्या उर्वरित 2023 आणि 2024 मॉडेल्सवर दिली जात आहे. या महिन्यात, कंपनी 2025 मॉडेल्सवर 42 हजारांपर्यंतच्या ऑफर देत आहे.
जितेंद्र EV ने लाँच केली Yunik इलेक्ट्रिक स्कूटर, ११८ km रेंजसह अनेक हटके फीचर्स
जानेवारी २०२५ मध्ये ऑफ-रोडिंग एसयूव्ही म्हणून येणाऱ्या जिमनीवर मारुती लाखो रुपयांच्या ऑफर्स देत आहे. कंपनी या महिन्यात जिमनीवर 1.90 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर देत आहे. ही ऑफर त्यांच्या २०२३ आणि २०२४ मॉडेल्सवर उपलब्ध आहे. कंपनी या महिन्यात २०२५ जिमनीवर 25,000 रुपयांची सूट देत आहे.
सियाझ ही मारुतीने मध्यम आकाराची सेडान कार म्हणून ऑफर केली आहे. जर तुम्ही ही कार जानेवारी 2025 मध्ये खरेदी केली तर तुम्हाला जास्तीत जास्त 60 हजार रुपयांची ऑफर मिळेल. ही ऑफर कारच्या 2023 आणि 2024 मॉडेल्सवर उपलब्ध आहे. याशिवाय, या महिन्यात 2025 युनिट्सवर 30 हजार रुपयांपर्यंत बचत करता येईल.
मार्केटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या MG Windsor EV Exclusive Variant ला फक्त 3 लाखात आणा घरी
कंपनीच्या लक्झरी एमपीव्ही म्हणून येणाऱ्या Xl6 वर जानेवारी 2025 मध्ये 50 हजार रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर या वाहनाच्या २०२३ आणि २०२४ युनिट्सवर उपलब्ध आहे. कंपनी २०२५ युनिट्सवर २५,००० रुपयांची सूट देत आहे.
जानेवारी 2025 मध्ये मारुती फ्रॉन्क्स खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. कंपनी जानेवारी महिन्यात या एसयूव्हीच्या 2023 आणि 2024 युनिट्सवर 60 हजार रुपयांच्या ऑफर देत आहे. या कारच्या 2025 मॉडेल्सवर 30 हजार रुपयांच्या ऑफर दिल्या जात आहेत.
नेक्सा डीलरशिपवर मारुतीने ऑफर केलेली सर्वात स्वस्त कार इग्निसवर या महिन्यात 77100 रुपयांच्या ऑफर्स मिळत आहेत. या ऑफर त्यांच्या २०२३ आणि २०२४ च्या युनिट्सवर उपलब्ध आहेत. या महिन्यात २०२५ इग्निस खरेदी केल्याने 52100 रुपये वाचू शकतात.
याव्यतिरिक्त, मारुती इन्व्हिक्टो, आणि Maruti Grand Vitara वर सुद्धा जबरदस्त ऑफर देत आहे.