Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक-दोन नव्हे तर ‘या’ 5 एसयूव्ही लाँच करण्याच्या आहे तयारीत Maruti Suzuki

ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने भारतीय कार मार्केटमध्ये अनेक उत्कृष्ट कार आणि एसयूव्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2025 मध्ये पाच SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 07, 2024 | 06:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

सध्या देशात अनेक कार्स लाँच होताना दिसत आहे. त्यातही इलेक्ट्रिक कार्सची मोठी संख्या आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे, त्याचप्रमाणे एसयूव्ही कार्सची मागणी सुद्धा जोर धरत आहे. हीच बाब लक्षात घेता देशातील आघाडीची उत्पादक कंपनी मारुती सुझुकी जानेवारी 2025 मध्ये एक दोन नव्हे तर पाच एसयूव्ही लाँच करणार आहे. चला या नवीन एसयूव्हीज बद्दल जाणून घेऊया.

मारुती ईव्हीएक्स (Maruti EVx)

मारुती इलेक्ट्रिक SUV म्हणून EVx लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनी जानेवारीमध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटीमध्ये लाँच होईल अशी अपेक्षा आहे. याआधी, जानेवारी 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने त्याची कंसेप्ट व्हर्जन प्रदर्शित केले होते. विशेष बाब म्हणजे ही SUV कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV असणार आहे.

हे देखील वाचा: TATA off-road SUV होणार जानेवारी 2025 मध्ये लाँच, Mahindra Thar ला मिळणार कांटे की टक्कर

मारुती कॉम्पॅक्ट एसयूव्ही (Maruti Compact SUV)

रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रिक SUV व्यतिरिक्त, कंपनी मायक्रो SUV सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे उत्कृष्ट डिझाइन आणि फीचर्ससह शहरांमध्ये चालवण्यासाठी आणले जाईल. या नवीन कारमध्ये पेट्रोलसोबत हायब्रीड तंत्रज्ञानही दिले जाऊ शकते.

मारुती ग्रँड विटारा फेसलिफ्ट (Maruti Grand Vitara Facelift)

ग्रँड विटारा मारुतीने मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केले आहे. या SUV चे फेसलिफ्ट व्हर्जन देखील पुढील वर्षी भारतीय बाजारात लाँच केले जाईल. हे त्याचे मिड-लाइफ फेसलिफ्ट असेल ज्यामध्ये बहुतेक बदल असतील. इंजिनमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, पण त्यास माइल्‍ड तसेच मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान दिले जाईल.

मारुती ग्रँड विटारा 7 सीटर (Maruti Grand Vitara 7 Seater)

वृत्तानुसार, ग्रँड विटाराची सात-सीट असणारे व्हर्जन देखील मारुती पुढील वर्षी लाँच करू शकते. कंपनीमध्ये याला Y17 या नावाने ओळखले जात आहे. डिझाईनच्या बाबतीत ते ग्रँड विटारा सारखेच असेल पण त्यात तीन रो सीट्सचा पर्याय दिला जाईल. याच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एसयूव्हीच्या फेसलिफ्ट व्हर्जनसोबतच त्याची सात-सीट व्हर्जनही लाँच केले जाईल अशी अपेक्षा आहे.

मारुती फ्रंटएक्स फेसलिफ्ट (Maruti Fronx Facelift)

मिळालेल्या माहितीनुसार, मारुतीची फेसलिफ्टही पुढील वर्षी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. क्रॉसओवर एसयूव्ही म्हणून, जानेवारी 2023 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये सादर केलेली ही एसयूव्ही बाजारात खूप पसंत केली जात होती. अशी अपेक्षा आहे की कंपनी या एसयूव्हीच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यासोबतच त्यात मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान देखील आणू शकते. त्यामुळे याचे मायलेज 30 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत असू शकते. मात्र, याच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: Maruti suzuki is preparing to launch 5 suvs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 06:29 PM

Topics:  

  • auto news
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

फ्रॉन्क्स ते ग्रँड विटारा! लवकरच येणार मारुतीच्या 5 Facelift Cars; पाहा कोणती बनेल तुमची फेवरेट!
1

फ्रॉन्क्स ते ग्रँड विटारा! लवकरच येणार मारुतीच्या 5 Facelift Cars; पाहा कोणती बनेल तुमची फेवरेट!

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या
2

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या

भारतात तयार झालेल्या गाड्यांची जपानमध्ये वाढती मागणी; मारुती सुझुकीच्या या तीन गाड्यांची १ लाखांवरची निर्यात
3

भारतात तयार झालेल्या गाड्यांची जपानमध्ये वाढती मागणी; मारुती सुझुकीच्या या तीन गाड्यांची १ लाखांवरची निर्यात

Best EV: शहरात रोज चालविण्यासाठी कोणती EV उत्तम? OLA S1 Pro की Ather 450X, तुम्ही काय निवडाल
4

Best EV: शहरात रोज चालविण्यासाठी कोणती EV उत्तम? OLA S1 Pro की Ather 450X, तुम्ही काय निवडाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.