फोटो सौजन्य: @carandbike (X.com)
भारतीय कार मार्केटमध्ये अनेकदा नवनवीन कार लाँच होत असतात. पण असे जरी असले तरी काही कार्स अशा देखील आहेत, ज्या आजही मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण करून आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारुती सुझुकी स्विफ्ट.
मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. यात सर्वात पहिले नाव येते ते मारुती स्विफ्ट. कंपनीने बदलत्या काळानुसार या कारमध्ये अनेक बदल देखील केले आहेत. आता तर ही कार चक्क Wagon R आणि Baleno वरच भारी पडली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये मारुती सुझुकी वॅगनआरची जादू थोडी ओसरली. गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारच्या यादीत, वॅगनआरला 9 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. एवढेच नव्हे तर कंपनीची प्रीमियम हॅचबॅक बलेनो देखील 10 व्या स्थानावर राहिली. अशा परिस्थितीत, गेल्या महिन्यात सर्वात जास्त पसंत केलेली हॅचबॅक मारुती स्विफ्ट ठरली आहे. गेल्या महिन्यात, टॉप-10 यादीत एसयूव्हींनी वर्चस्व गाजवले. यानंतरही स्विफ्टला 14,592 ग्राहक मिळाले. या यादीत ही कार 7 व्या स्थानावर राहिली आहे. स्विफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. चला स्विफ्टच्या डिझाइन आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
‘या’ SUV ने Tata Punch ला बाहेरचा रस्ता दाखवत मिळवले Top 10 Cars च्या यादीत स्थान
या कारमध्ये पूर्णपणे नवीन इंटिरिअर दिसेल. त्याचे केबिन खूपच आलिशान आहे. त्यात मागील एसी व्हेंट्स आहेत. या कारमध्ये वायरलेस चार्जर आणि ड्युअल चार्जिंग पोर्ट उपलब्ध असेल. त्यात रियर व्ह्यू कॅमेरा असेल, ज्यामुळे ड्रायव्हर कार सहजपणे पार्क करू शकेल. यात 9 इंचाचा फ्री-स्टँडिंग इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. यात नवीन डिझाइन केलेला डॅशबोर्ड आहे. ही स्क्रीन वायरलेस कनेक्टिव्हिटीसह अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते. सेंटर कन्सोलची पुनर्रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये बलेनो आणि ग्रँड विटारा प्रमाणेच ऑटो क्लायमेट कंट्रोल पॅनल आहे.
नवीन स्विफ्टच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात हिल होल्ड कंट्रोल, ईएसपी, नवीन सस्पेंशन आणि सर्व व्हेरियंटसाठी 6 एअरबॅग्ज असतील. यात क्रूझ कंट्रोल, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), ब्रेक असिस्ट (BA) सारखी अद्भुत सेफ्टी फीचर्स आहेत. याशिवाय, त्यात एक नवीन एलईडी फॉग लॅम्प आहे.
अशाप्रकारे ऑनलाईन बुकिंग कराल तर काहीच दिवसात हातात येईल HSRP Number Plate
या कारच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात पूर्णपणे नवीन Z सीरीज इंजिन दिसेल, जे जुन्या स्विफ्टच्या तुलनेत मायलेज लक्षणीयरीत्या वाढवते. त्यात असलेले पूर्णपणे नवीन 1.2 लीटर Z12E 3-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन 80bhp पॉवर आणि 112nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.