फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्स अनेक वर्षांपासून दमदार कार्स ऑफर करत आली आहे. ग्राहकांचा देखील या कंपनीच्या कार्सवर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच तर विक्रीच्या बाबतीत टाटा नेहमीच टॉपच्या कंपन्यांमध्ये दिसत असते. पण नुकताच एप्रिल 2025 मधील सेल्स रिपोर्ट जारी झाला आहे. यात कंपनीची विक्री कमी तर झालीच आहे. पण त्यातही कंपनीच्या टाटा पंचला एका एसयूव्हीने मागे टाकले आहे.
खरं तर, गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये सर्वाधिक खरेदी केलेल्या 10 कारच्या यादीत टाटा पंचला स्थान मिळवता आले नाही. अनेक महिन्यांनंतर किंवा वर्षभरानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पंचला या यादीत स्थान मिळवता आले नाही. या यादीत पंचची जागा महिंद्रा स्कॉर्पिओने घेतली आहे. खरंतर, स्कॉर्पिओ बऱ्याच काळापासून या यादीतून बाहेर राहत होती, पण एप्रिलमध्ये या कारच्या विक्रीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 15,534 युनिट्सच्या विक्रीसह ही एसयूव्ही या यादीत टॉप-5 मध्ये पोहोचली आहे.
अशाप्रकारे ऑनलाईन बुकिंग कराल तर काहीच दिवसात हातात येईल HSRP Number Plate
जर आपण गेल्या 6 महिन्यांतील टाटा पंच आणि महिंद्रा स्कॉर्पिओच्या विक्रीच्या आकडेवारीवर एकदा नजर टाकली तर हे स्पष्ट होते की पंचने नेहमीच स्कॉर्पिओला मात दिली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पंचच्या 15,435 युनिट्स आणि स्कॉर्पिओच्या 12,704 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. तर डिसेंबर 2024 मध्ये पंचच्या 15,073 युनिट्स आणि स्कॉर्पिओच्या 12,195 युनिट्स विकल्या गेल्या होत्या .मात्र नवीन वर्षात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये पंचला मागे टाकले आहे. यात स्कॉर्पिओ 15,534 युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या स्थानावर आहे. चला या एसयूव्हीच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
कंपनीने स्कॉर्पिओ एन मध्ये अगदी नवीन सिंगल ग्रिल दिली आहे. त्यात क्रोम फिनिशिंग दिसून येते. कंपनीचा नवीन लोगो ग्रिलवर दिसत आहे. ज्यामुळे समोरील लूक अधिक आकर्षक दिसते. यात नवीन डिझाइन केलेले एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन फॉग लॅम्प हाऊसिंगसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट बंपर, सी-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, षटकोनी लोअर ग्रिल इन्सर्टसह रुंद सेंट्रल एअर इनलेट यांचा समावेश आहे.
TVS, Hero आणि Bajaj Auto सारख्या टू व्हीलर कंपन्यांसाठी कसा होता April 2025 महिना?
एसयूव्हीमध्ये नवीन डिझाइन केलेल्या टू-टोन व्हील्सचा सेट दिला आहे. या एसयूव्हीच्या एक्सटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, यात क्रोम केलेले डोअर हँडल, क्रोम केलेले विंडो लाईन, शक्तिशाली रूफ रेल, ट्विक केलेले बोनेट आणि साइड-हिंग्ड डोअर असलेले बूटलिड, अपडेटेड रिअर बंपर, पूर्णपणे नवीन व्हर्टिकल एलईडी टेल लॅम्प आहेत. स्कॉर्पिओ एन मध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आहे.
यात नवीन डॅश आणि सेंटर कन्सोल, अपडेटेड सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील, रूफ-माउंटेड स्पीकर्स, लेदर सीट्स, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, वायरलेस चार्जिंग पॅड, सेंट्रली माउंटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. सुरक्षेसाठी, सनरूफ, 6 एअरबॅग्ज, रिव्हर्स कॅमेरा,आणि असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.