फोटो सौजन्य: @MSArenaOfficial/X.com
भारतात मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक दमदार कार ऑफर होत असतात. या कारला ग्राहकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. यामुळेच अनेक ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये उत्तम एसयूव्ही कार ऑफर करत असतात. नुकतेच Maruti Suzuki ने सुद्धा या सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच केली आहे.
भारतामधील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने नुकतीच आपली नवीन मिड साइझ एसयूव्ही Maruti Victoris भारतीय बाजारात सादर केली आहे. लाँचिंगसोबतच या एसयूव्हीच्या बुकिंगची सुरुवात करण्यात आली होती. जर तुम्हीही ही एसयूव्ही बुक केली असेल, तर आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण कंपनीकडून याच्या डिलिव्हरीची तयारी सुरू झाली आहे.
Safest Cars: काहीही झालं तरी जीव सुरक्षित राहणार! ‘या’ आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार
मारुती व्हिक्टोरिसची देशभरातील डिलिव्हरी 22 सप्टेंबर सोमवारपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यामुळे लाँचिंगनंतर ज्यांनी बुकिंग केली होती त्यांना आता लवकरच त्यांची एसयूव्ही मिळणार आहे.
कंपनीने व्हिक्टोरिसची एक्स-शोरूम इंट्रोडक्टरी किंमत 10.50 लाख रुपये ठेवली आहे, तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19.98 लाख रुपये इतकी आहे.
व्हिक्टोरिस एसयूव्हीमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड रिअर टेल लाइट्स, शार्क फिन अँटेना, 26.03 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डॉल्बी ॲटमॉस साऊंड सिस्टीम, जेस्चर कंट्रोल टेलगेट, एंबियंट लाईटिंग, अलेक्सा ऑटो व्हॉईस असिस्टंट, 35 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स यांचा समावेश आहे. तसेच, इंटीरियरमध्ये काळा, ग्रे आणि सिल्वर रंगांचा आकर्षक वापर केला आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत व्हिक्टोरिसनेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या एसयूव्हीला भारत एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपीकडून क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये 6 एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, आयसोफिक्स चाईल्ड सीट अँकरज यांसारखी सुरक्षितता वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
विक्टोरिसमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे, जे उत्तम पॉवर आणि टॉर्क निर्माण करते. यासोबतच 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिले आहेत. विशेष म्हणजे ही एसयूवी स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञान आणि सीएनजी व्हेरिएंट्समध्ये देखील उपलब्ध आहे.
मारुती व्हिक्टोरिसचे मिड-साईज एसयूवी सेगमेंटमधील थेट स्पर्धक म्हणजे Maruti Grand Vitara, Kia Seltos, Hyundai Creta, Skoda Kushaq, Volkswagen Taigun,Tata Harrier, Honda Elevate, आहेत.