फोटो सौजन्य: iStock
पूर्वी कार खरेदी करताना ग्राहक फक्त कारच्या किंमत आणि मायलेजकडेच लक्ष द्यायचे. मात्र, आजचा ग्राहक कार खरेदी करताना स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेला सुद्धा प्राधान्य देतो. म्हणूनच तर आता अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारमध्ये दमदार फीचर्स समाविष्ट करत आहे. तसेच सरकारने देखील रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे Bharat NCAP योजना सुरू केली, ज्यामुळे कारची सुरक्षा तपासली जाऊन त्यांना सेफ्टी रेटिंग दिली जाते.
अलीकडच्या महिन्यांत Bharat NCAP ने 2025 मधील सर्वात सुरक्षित कार्सची यादी जाहीर केली. या यादीत 5 कार्सना 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे, यात देशातील लोकप्रिय कार Maruti Suzuki Dzire चाही समावेश आहे. चला देशातील सर्वात सुरक्षित कारबद्दल जाणून घेऊयात.
Hyundai Venue N Line ची नवी जनरेशन टेस्टिंग दरम्यान स्पॉट, मिळाली ‘ही’ माहिती
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही भारतातील लोकप्रिय MPV असून तिला Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यात 6 एअरबॅग्स, डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आणि फ्रंट-रियर पार्किंग सेन्सर्ससह अनेक ॲडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
टाटा हॅरियर EV ला भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक SUV मानले जाते. तिला Adult Safety साठी 32 पैकी 32 आणि Child Safety साठी 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. तिच्या सेफ्टी फीचर्समध्ये 7 एअरबॅग्स, लेव्हल 2 ADAS, 540° क्लियर व्ह्यू, 360° 3D कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), SOS कॉल फंक्शन आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) यांचा समावेश आहे.
Triumph ची 350cc बाईक होऊ शकते लाँच, GST 2.0 नंतर किंमत होणार कमी?
मारुति सुजुकी डिजायर ही भारतातील पहिली सेडान ठरली आहे, जिने Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. अनेक वर्षांपासून देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडान्सपैकी ही एक आहे. याच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स स्टॅंडर्ड आहेत तसेच ESP+, हिल-होल्ड असिस्ट, 360° कॅमेरा, ABS+EBD आणि TPMS असे फीचर्स दिलेले आहेत.
किया सायरॉस ही एक नवी SUV असून तिलाही Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. याला Adult Safety मध्ये 30.21/32 आणि Child Safety मध्ये 44.42/49 गुण मिळाले आहेत. यात लेव्हल 2 ADAS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM) आणि 20 हून अधिक स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स दिले आहेत.