फोटो सौजन्य: iStock
येत्या 22 सप्टेंबर 2025 पासून भारतात नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. यामुळे वाहन खरेदीदारांना चांगला दिलासा मिळाला आहे. तसेच, या निर्णयामुळे अनेक कार स्वस्त झाल्यात. खरतर Maruti Suzuki ची Alto कार देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जात होती. मात्र, आता Maruti S-Presso देशातील सर्वात स्वस्त कार झाली आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने अरेना आणि नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या सर्व कारच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. कंपनीने 1.30 लाखांपर्यंत किमती कमी करून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. नवीन किमतींमुळे अल्टो कंपनीसाठी K10 पेक्षा अधिक परवडणारे एक मॉडेल बनले आहे.
सरकारच्या नवीन GST 2.0 चा मारुती कारवर परिणाम झाल्यामुळे S-Presso ही नवीन एंट्री-लेव्हल कार बनली आहे. या मायक्रो SUV ची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 3.49 लाख आहे. मनोरंजक म्हणजे, अल्टोची नवीन किंमत 3.69 लाख आहे, ज्यामध्ये 20,000 चा फरक आहे.
मारुती S-Presso 8 व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे, ज्यात बेस मॉडेल STD आणि टॉप व्हेरिएंट VXI CNG यांचा समावेश आहे. यात 1-लीटर पेट्रोल इंजिन दिलेले असून हे 68PS पॉवर आणि 90Nm टॉर्क निर्माण करते. ही गाडी 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे, तर CNG व्हर्जन फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह मिळते.
मारुती S-Presso पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 24.12 ते 25.30 किलोमीटर प्रति लिटर आणि CNG व्हेरिएंटमध्ये 32.73 किलोमीटर प्रति किलोग्राम पर्यंत मायलेज देण्याचा दावा करते.
मारुती S-Presso मध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल क्लस्टर, ड्युअल एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर, हिल होल्ड असिस्ट आणि ABS+EBD यांसारखी फीचर्स मिळतात. कमी बजेटमध्ये चांगला मायलेज आणि फीचर्स हवे असलेल्या ग्राहकांसाठी, Maruti S-Presso एक विश्वासार्ह पर्याय ठरली आहे.
मायलेजच्या बाबतीत, पेट्रोल MT व्हेरिएंट 24 kmpl, पेट्रोल AMT व्हेरिएंट 24.76 kmpl आणि CNG व्हेरिएंट 32.73 km/kg पर्यंत मायलेज देते.