फोटो सौजन्य: iStock
मार्केटमध्ये काही असेही ऑटो ब्रँड आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच कार विकल्या जातात. असाच एक मोठा ऑटो ब्रँड म्हणजे मर्सिडीज-बेंझ. आजही लक्झरी ऑटो ब्रँड म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर मर्सिडीजचे नाव येते. कंपनीने वेळोवेळी नवनवीन बदलांनुसार त्यांच्या कार अपडेट केल्या आहेत. नुकतेच कंपनीच्या इलेक्ट्रिक कारने मोठा कारनामा केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
जर्मन ऑटोमेकर मर्सिडीज-एएमजीची कॉन्सेप्ट कार Mercedes-AMG GT XX ने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. या कारने 25 नवीन विक्रम मोडले आहे. सर्वात मोठा विक्रम म्हणजे या कारने फक्त 24 तासांत 3,405 मैल (5,479 किमी) अंतर कापले, जे गेल्या महिन्यात XPeng P7 ने बनवलेल्या विक्रमापेक्षा 943 मैल जास्त आहे.
खरं तर, ही कार सतत 186 मैल प्रति तास (300 किमी/तास) वेगाने चालवली जात होती आणि फक्त चार्जिंग करताना थांबली होती. विशेष म्हणजे ती 850 किलोवॅटच्या पॉवरने चार्ज झाली होती, ज्यामुळे ती बराच वेळ न थांबता धावत राहिली.
या विक्रमी मोहिमेसाठी 17 ड्रायव्हर्सची एक टीम तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये F1 चालक जॉर्ज रसेल देखील होता. सर्व चालकांनी प्रत्येकी 2 तासांच्या शिफ्टमध्ये ही कार चालवली. या काळात, कारने केवळ 7 दिवस, 13 तास, 24 मिनिटे आणि 7 सेकंदात 24,901 मैल (40,075 किमी) अंतर कापले, जे पृथ्वीभोवतीच्या अंतराइतके आहे. सर्वात अषाचार्याची बाब म्हणजे ही कामगिरी एका नव्हे तर दोन GT XX कारने जवळजवळ एकाच वेळी साध्य केली.
टीमने दोन्ही कार्स तब्बल 25,000 मैल (40,233 किमी) पेक्षा जास्त चालवत, 7 दिवस, 14 तास, 9 मिनिटे आणि 52 सेकंदांत एक नवा बेंचमार्क स्थापित केला. या काळात कारने 12, 24, 48, 72, 96, 120, 144 आणि 168 तासांच्या टाइमलाइनमध्ये सर्वाधिक अंतर पार करण्याचे विक्रम मोडले आहे.
जरी GT XX सध्या एक कॉन्सेप्ट कार असली तरी ती Mercedes-AMG च्या येणाऱ्या 4-दरवाजांच्या इलेक्ट्रिक कूपेचे प्रीव्ह्यू आहे. जेव्हा हे प्रॉडक्शन मॉडेल बाजारात येईल, तेव्हा ग्राहकांनाही अशीच उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि रेंज अनुभवायला मिळणार आहे. Mercedes च्या मते, काळानुसार त्यांची हाय-टेक बॅटरी आणि मोटर टेक्नॉलॉजी स्वस्त मॉडेल्समध्येही उपलब्ध करून दिली जाईल.