
फोटो सौजन्य: X.com
2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी
नवी Mercedes-Benz S-Class आता पूर्वीपेक्षा अधिक शाही आणि दमदार दिसते. तिची फ्रंट ग्रिल सुमारे 20 टक्क्यांनी मोठी करण्यात आली असून ती आता इल्यूमिनेटेड आहे. ग्रिलमध्ये 3D क्रोम स्टार एलिमेंट्स देण्यात आले आहेत. बोनटवरील आयकॉनिक Mercedes स्टार देखील प्रकाशमान होतो, ज्यामुळे रात्री कारचा रोड प्रेझेन्स अधिक आकर्षक दिसतो. हेडलॅम्प्समध्ये ट्विन-स्टार मोटिफसह नवे डिजिटल लाइट्स देण्यात आले आहेत, तर मागील बाजूस LED टेललॅम्प्समध्येही स्टार-शेप डिझाइन मिळते. दरवाजा उघडताच जमिनीवर Mercedes-Benz लिहिलेले लाइट प्रोजेक्शनही दिसते.
फेसलिफ्टेड S-Class मध्ये नवी जनरेशन डिजिटल लाइट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे, जी मायक्रो-LED तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचा इल्यूमिनेशन एरिया आधीपेक्षा सुमारे 40 टक्क्यांनी मोठा आहे. हा सिस्टम कॅमेरा आणि नेव्हिगेशन डेटाच्या आधारे लाइट पॅटर्न आपोआप अॅडजस्ट करतो, त्यामुळे रात्री ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि आरामदायक होते.
2027 S-Class च्या इंटीरियरमध्ये सर्वात मोठे बदल पाहायला मिळतात. यात MBUX सुपरसक्रीन देण्यात आली आहे, जी संपूर्ण डॅशबोर्ड व्यापते. यामध्ये 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 14.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3-इंच फ्रंट पॅसेंजर डिस्प्लेचा समावेश आहे. ही सिस्टम नवीन MB.OS वर चालते, जे फास्ट प्रोसेसिंग आणि ओव्हर-द-एअर अपडेट्सना सपोर्ट करते.
नवी S-Class जनरेटिव AI आणि ChatGPT सपोर्टसह MBUX सिस्टम घेऊन येते. Hey Mercedes व्हॉईस असिस्टंट आता अधिक नैसर्गिक पद्धतीने संवाद साधू शकतो. मागील सीट्ससाठी ड्युअल 13.1-इंच एंटरटेनमेंट स्क्रीन, डिटॅचेबल टॅबलेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळेच S-Class ला आजही “Boardroom on Wheels” असे म्हटले जाते.
नवी Mercedes-Benz S-Class पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि V8 इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रिअर-व्हील स्टीयरिंग, AIRMATIC एअर सस्पेन्शन आणि E-ACTIVE BODY CONTROL यांसारखी अत्याधुनिक फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी MB.DRIVE सिस्टम, ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स देण्यात आले आहेत.