
फोटो सौजन्य: iStock
Volkswagen च्या आगामी गाड्यांमध्ये Tayron R-Line ही सर्वाधिक चर्चेत असलेली SUV आहे. कंपनीने या प्रीमियम 7-सीटर SUV चे अधिकृत फोटोही जारी केले आहेत. Tayron R-Line सर्वात आधी लाँच होण्याची शक्यता आहे. ही SUV अशा ग्राहकांसाठी असेल, ज्यांना स्टाइल, भरपूर स्पेस आणि दमदार परफॉर्मन्स एकाच वेळी हवा आहे. समोर आलेल्या चित्रांवरून तिचा डिझाइन इतर Volkswagen SUVs पेक्षा अधिक स्पोर्टी आणि मस्क्युलर दिसतो.
नवीन Hyundai Creta च्या इंटिरिअरची दिसली पहिली झलक, मिळाली ‘ही’ खास माहिती
Tayron R-Line ला स्पोर्टी डिझाइन लँग्वेजसह सादर करण्यात येणार आहे. तिचा एक्सटेरियर लूक अतिशय बोल्ड असून, शार्प बॉडी लाईन्स आणि प्रीमियम फिनिशमुळे SUV अधिक आकर्षक दिसते. फॅमिली आणि लाँग ड्राइव्हसाठी ही एक उत्तम प्रीमियम पर्याय ठरू शकते.
फीचर्सच्या बाबतीत Tayron R-Line अत्याधुनिक असेल. यात 15-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट करेल. याशिवाय 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, Harman Kardon साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, ड्युअल वायरलेस चार्जर, थ्री-झोन ऑटोमॅटिक AC, 30-कलर एम्बियंट लाइटिंग आणि मसाज फंक्शनसह फ्रंट सीट्स देण्यात येतील.
सेफ्टीसाठी Tayron R-Line मध्ये 9 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पार्किंग सेन्सर्स, चारही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ADAS सारखे फीचर्स मिळतील. या SUV ची लांबी 4792 मिमी असून व्हीलबेस 2789 मिमी आहे. तीन रो सीट्ससह 345 लीटर बूट स्पेस मिळेल, तर तिसरी रो फोल्ड केल्यास 850 लीटरपर्यंत बूट स्पेस उपलब्ध होईल.