
फोटो सौजन्य: Pinterest
Hyundai ची तिसरी जनरेशन Hyundai Creta सध्या सातत्याने चर्चेत आहे. अलीकडेच साउथ कोरियामध्ये टेस्टिंगदरम्यान ही SUV दिसल्यानंतर आता तिच्या इंटिरिअरच्या नव्या स्पाय इमेजेस समोर आल्या आहेत. या फोटोवरून स्पष्ट होते की पुढील जनरेशनची Creta सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक प्रीमियम आणि आधुनिक असणार आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या जनरेशन Creta च्या फेसलिफ्टनंतर अवघ्या 2 वर्षांत हा खुलासा झाला असून, यावरून Hyundai साठी Creta किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित होते.
लेटेस्ट स्पाय इमेजेसनुसार, नव्या Creta मध्ये पूर्णपणे नवीन इंटिरिअर लेआउट देण्यात येणार आहे. डॅशबोर्ड सध्या कॅमुफ्लाजमध्ये असला तरी केबिनचा एकूण लूक अधिक क्लीन आणि मॉडर्न दिसतो. लेआउट आधीपेक्षा अधिक हॉरिजॉन्टल असून, प्रीमियम फील देतो, जो Hyundai च्या नव्या ग्लोबल SUVs ची झलक दाखवतो.
याशिवाय, इनसाइड डोअर हँडल्सचा डिझाइनही नव्याने तयार करण्यात आला असून, तो अधिक सिंपल आणि एलिगंट दिसतो. हे बदल Creta ला अधिक मॅच्युअर आणि अपमार्केट SUV बनवण्याकडे इशारा करतात.
बस्स 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि MG Hector ची चावी तुमच्या हातात पडलीच म्हणून समजा, जाणून घ्या EMI
टेस्ट म्यूलमध्ये ब्लॅक लेदरेट सीट्स दिसून आल्या आहेत, ज्या टॉप व्हेरिएंट्ससाठी असतील. विशेष बाब म्हणजे फ्रंट सीटच्या हेडरेस्टचा डिझाइन, जो मोठ्या प्रमाणात नव्या जनरेशन Kia Seltos सारखे आहे. रिअर सीट्समध्येही मोठा सुधार दिसतो.
नव्या Creta मध्ये मागील प्रवाशांसाठी आधीपेक्षा अधिक लेगरूम मिळण्याची शक्यता आहे, ज्यावरून व्हीलबेस वाढवण्यात आला असावा किंवा पॅकेजिंग अधिक चांगले करण्यात आले असावे असे सूचित होते. तसेच आता तीनही रिअर पॅसेंजर्ससाठी अॅडजस्टेबल हेडरेस्ट देण्यात आले आहेत, जे कम्फर्टसोबतच सेफ्टीच्या दृष्टीनेही मोठे अपग्रेड आहे. रिअर AC व्हेंट्सची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.
पूर्वी Hyundai ने 2027 च्या सुरुवातीला लाँचचा इशारा दिला होता, मात्र आता कंपनी ही SUV दिवाळी 2026 च्या आसपास सादर करू शकते असे मानले जात आहे. वेगाने वाढत असलेल्या मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा लक्षात घेता, हा मॉडेल Hyundai साठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.