Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार कंपन्यांना सेफ्टी फीचर्सवर द्यावे लागणार बारीक लक्ष! लवकरच येऊ शकतो BNCAP 2.0

भारतातील कार सुरक्षितता आणखी कडक करण्यासाठी, MoRTH ने भारत NCAP 2.0 चा मसुदा जारी केला आहे. यामुळे कार कंपन्यांसाठी सेफ्टीचे नियम अधिक कठोर होण्याची शक्यता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 23, 2025 | 09:22 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • आता सेफ्टी नियम अधिक कडक होण्याची संभावना
  • MoRTH ने भारत NCAP 2.0 चा मसुदा जारी केला
  • नवीन प्रस्ताव ऑक्टोबर 2027 पासून अंमलात आणण्याची योजना
पूर्वी कार खरेदी करताना फक्त कारच्या मायलेज आणि किमतीकडे पहिले जायचे. मात्र, आजचा ग्राहक कारमधील सेफ्टी फीचर्सकडे सुद्धा कटाक्षाने पाहतो. अनेक कार उत्पादक कंपन्या देखील त्यांच्या कारमध्ये स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स म्हणून 6 एअरबॅग्स आणि अन्य फीचर्स ऑफर करतात. तसेच ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी Bharat NCAP मध्ये कारची सेफ्टी टेस्ट घेत असतात. मात्र, आता सेफ्टी नियम अधिक कडक होण्याची संभावना आहे.

भारतीय वाहन चालकांच्या सुरक्षेला पुढील स्तरावर नेण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) भारत NCAP 2.0 साठी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केली आहे. AIS-197 रिव्हिजन 1 नावाचा हा नवीन प्रस्ताव ऑक्टोबर 2027 पासून अंमलात आणण्याची योजना आहे.

आतापर्यंत, भारत NCAP मध्ये एखाद्या कारची सुरक्षा प्रामुख्याने प्रौढ आणि मुलांच्या प्रवाशांच्या संरक्षणावर आधारित होती. परंतु, सरकारने चाचणीची व्याप्ती आणि स्टॅंडर्डमध्ये लक्षणीयरीत्या वाढवली आहेत. आता पाच वेगवेगळ्या सुरक्षा श्रेणींमधील स्कोअर एकत्रित करून कारला स्टार रेटिंग दिले जाईल. यामुळे प्रत्येक कारच्या सुरक्षिततेचे अधिक अचूक मूल्यांकन करणे शक्य होईल.

Toyota Fortuner ला फुटलाय घाम! Kia ची ‘ही’ Hybrid Car मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार

क्रॅश टेस्ट आता अधिक कडक होणार

BNCAP 2.0 मध्ये सुरक्षा मूल्यांकनामध्ये सर्वाधिक महत्व क्रॅश टेस्टलाच (55%) दिले जाणार आहे. फरक इतकाच की, यापूर्वी कंपन्या मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि एअरबॅग्सच्या आधारावर सहज 5-स्टार रेटिंग मिळवू शकत होत्या; मात्र आता ते शक्य राहणार नाही.

नवीन सिस्टममध्ये पाच अनिवार्य आणि अधिक कठीण क्रॅश टेस्ट समाविष्ट करण्यात आले आहेत. यात कारचे स्ट्रक्चर, अपघातानंतरचे परिणाम आणि प्रवाशांची सुरक्षा या सर्वांची तपशीलवार टेस्टिंग होणार आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना तांत्रिक सुधारणा करून गाडी अधिक सुरक्षित बनवणे अनिवार्य होणार आहे.

ADAS फीचर्सला मिळणार विशेष गुण

आता वाहनाची सुरक्षा फक्त त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवर अवलंबून राहणार नाही, तर ADAS (Advanced Driver Assistance Systems) फीचर्सलाही महत्त्व दिले जाईल.

नवीन नियमांनुसार 10% स्कोर ADAS फीचर्ससाठी राखीव असेल, ज्यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन-कीपिंग, फ्रंट कोलिजन वॉर्निंग यांसारखे आधुनिक फीचर्स समाविष्ट आहेत.

Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी डोक्यात ‘या’ गोष्टी फिट करून घ्या

या बदलामुळे कार्समध्ये आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि रस्ते अपघात आधीच टाळण्यास मदत होईल.

पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य

नवीन BNCAP 2.0 मध्ये पादचारी आणि दोनचाकी वाहनचालकांच्या सुरक्षेलाही विशेष महत्त्व दिले जात आहे.

यामध्ये वाहनाच्या फ्रंट सेक्शनची स्वतंत्र चाचणी केली जाईल, ज्यामुळे अपघाताच्या वेळी पादचारीच्या डोक्यावर किंवा पायांवर होणारी दुखापत कमी होईल.

याशिवाय, AEB (Automatic Emergency Braking) सिस्टममध्ये पादचारी आणि दुचाकींची ओळख पटवण्याची क्षमता देखील स्कोरचा भाग असेल. या श्रेणीला 20% महत्व देण्यात आले असून यामुळे वाहन कंपन्यांना त्यांच्या डिझाइनमध्ये सुधारणा करणे आवश्यक होईल.

 

Web Title: Ministry of road transport and highways presented bncap 2 0 to increase safety of car owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 09:22 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Car
  • Road Safety

संबंधित बातम्या

Car Gear Tutorial: …तरच गाडीचे मायलेज खूप वाढेल! कोणत्या वेगाने कोणते गीअर बदलावे, फॉलो करा सोप्या टिप्स
1

Car Gear Tutorial: …तरच गाडीचे मायलेज खूप वाढेल! कोणत्या वेगाने कोणते गीअर बदलावे, फॉलो करा सोप्या टिप्स

Tata Punch Launch: कार खरेदी करण्याची आताच योग्य वेळ! बोल्ड लूक, स्मार्ट फीचर्ससह CNG आणि ऑटोमॅटिक; नवीन टाटा पंच लाँच
2

Tata Punch Launch: कार खरेदी करण्याची आताच योग्य वेळ! बोल्ड लूक, स्मार्ट फीचर्ससह CNG आणि ऑटोमॅटिक; नवीन टाटा पंच लाँच

डिसेंबर 2025 मध्ये Best Selling Car ठरलेली ‘ही’ एका झटक्यात होईल तुमची! फक्त ‘इतकाच’ असेल EMI
3

डिसेंबर 2025 मध्ये Best Selling Car ठरलेली ‘ही’ एका झटक्यात होईल तुमची! फक्त ‘इतकाच’ असेल EMI

Hyundai Creta चा हायब्रीड व्हर्जन भल्याभल्या वाहनांची ठसणार! जाणून घ्या फीचर्स आणि लाँचिंगची माहिती
4

Hyundai Creta चा हायब्रीड व्हर्जन भल्याभल्या वाहनांची ठसणार! जाणून घ्या फीचर्स आणि लाँचिंगची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.