फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतात इलेक्ट्रिक कार्सची डिमांड रोजच वाढताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे देखील अनेक ग्राहक इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कार खरेदी करत आहे. मात्र, अनेक इलेक्ट्रिक कार्सची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी नसते, त्यामुळे कित्येक जण बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक कारच्या शोधात असतात. हीच बाब लक्षात घेत MG Motors कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली. ही कार म्हणजे MG Comet EV. मात्र, आता या कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
एमजी मोटर इंडियाने त्यांच्या सर्वात स्वस्त आणि एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत. कंपनीने या कारची किंमत 1.94% किंवा 15000 पर्यंत वाढवली आहे. जर तुम्ही जुलै 2025 पासून ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला त्यासाठी किमान 12,700 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
खरं तर, एमजी मोटर्सने कॉमेट ईव्हीच्या किमती बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्येही कंपनीने या कारची किंमत अपडेट केली होती.
एमजी कॉमेट ईव्ही भारतीय बाजारात चार व्हेरिएंटमध्ये (Executive, Excite, Exclusive आणि 100-Year Edition) सादर करण्यात आली आहे. या सर्व व्हेरिएंटना एका पूर्ण चार्जवर सुमारे 230 किमीची ARAI प्रमाणित रेंज मिळते. त्यामुळेच ही रेंज दैनंदिन प्रवासासाठी एक आदर्श इलेक्ट्रिक कार बनवते.
एमजी कॉमेट ईव्हीचे डिझाइन चिनी इलेक्ट्रिक कार Wuling Air EV पासून प्रेरित आहे. याची लांबी 2974 मिमी, रुंदी 1505 मिमी आणि उंची 1640 मिमी आहे. या कारचा व्हीलबेस 2010 मिमी आहे आणि तिचा टर्निंग रेडियस 4.2 मीटर आहे, ज्यामुळे अरुंद रस्त्यांवर आणि मर्यादित जागांवर ही कार पार्क करणे खूप सोपे होते.
डिझाइनच्या बाबतीत, या कारमध्ये अनेक मॉडर्न एलिमेंट समाविष्ट केले आहेत, जसे की क्लोज्ड फ्रंट ग्रिल, फुल-रुंदी एलईडी लाईट स्ट्रिप, स्लीक हेडलॅम्प, मोठ्या आकाराचे दरवाजे, स्पोर्टी अलॉय व्हील्स आणि फ्लॅट रिअर सेक्शन. हे सर्व घटक एकत्रितपणे त्याला एक मिनी-मॉडर्न लूक देतात.
एमजी कॉमेट ईव्ही ही टेक्नॉलॉजी आणि आरामाचा उत्तम मिलाफ आहे. यात 10.25 इंचाचा मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जो म्युझिक, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, हवामानाची माहिती आणि रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स सारखे फीचर्स देतो. यासोबतच, यात 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देखील आहे, जो वाहनाशी संबंधित महत्त्वाचा डेटा दाखवतो. युझर्स त्यांचा स्मार्टफोन कारच्या सिस्टमशी जोडून व्हॉइस कमांड, कॉल, म्युझिक आणि नेव्हिगेशन सारख्या फीचर्सचा आनंद घेऊ शकतात.