Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्याला यश! आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई

Navarashtra Impact: आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण कारवाईत पक्षपात होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘नवराष्ट्र’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नगरपरिषद प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. २ ऑक्टोबरपासून अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 07:13 PM
‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्याला यश! आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई

‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्याला यश! आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमण कारवाईतील पक्षपाताच्या आरोपानंतर नगरपरिषद अ‍ॅक्शन मोडवर
  • २ ऑक्टोबरपासून मोहीम
  • आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमण हटवण्यास सुरुवात
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : शेवगाव शहरात काही दिवसांपूर्वी आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. मात्र, या कारवाईदरम्यान प्रशासनाने छोटे व्यापारी आणि श्रीमंत व्यापारी असा उघड भेदभाव केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट अहिल्यानगर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे अधिकृत तक्रार करत प्रशासनाने समान कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा थेट इशाराही दिला होता.(Navarashtra Impact)

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या बातमीचा दणका; स्मार्ट बाजारवर एफडीएची धडक!

‘नवराष्ट्र’च्या प्रतिनिधीने याबाबत जाब विचारल्यानंतर प्रशासनाची धावपळ- अतिक्रमण कारवाईतील या पक्षपाती भूमिकेबाबत आणि नागरिकांमधील वाढत्या असंतोषाबाबत नवराष्ट्र’ने शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया गाडघे यांना थेट जाब विचारला. नवराष्ट्र’च्या या रोखठोक प्रश्नांनंतर नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

या संदर्भात बोलताना मुख्याधिकारी विजया गाडघे यांनी स्पष्ट केले की, “अतिक्रमणाबाबत कोणतीही भेदभावपूर्ण कारवाई केली जाणार नाही. शहरात राहिलेले सर्व उर्वरित आणि बड्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण 2 ऑक्टोबरपासून मोहीम राबवून हटवण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले,अशी माहिती शेवगाव नगरपरिषद मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पवित्रा

याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी आरोप करताना म्हटले की, “प्रशासनाने कारवाई करताना केवळ गरीब आणि छोट्या टपरीधारकांना, किरकोळ व्यापाऱ्यांना लक्ष्य केले; तर श्रीमंत आणि वजनदार व्यापाऱ्यांच्या पक्क्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या अन्यायाविरोधात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असून, २ ऑक्टोबरच्या कारवाईतही टाळाटाळ झाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोकणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

सोनारपेठ मोजणीनंतर कारवाईला गती मिळण्याची शक्यता- दुसरीकडे, सोनारपेठ परिसरातील जमिनींची 2 नोव्हेंबरपासून होणारी शासकीय मोजणी आणि नगरपरिषदेने दिलेले 2 ऑक्टोबरपासूनच्या कारवाईचे आश्वासन यामुळे आता शेवगावातील अतिक्रमणांचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघण्याची चिन्हे आहेत. नगरपरिषदेच्या या आश्वासनानंतर अखेर प्रशासकीय स्तरावर प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

शेवगाव शहराचे नगरपरिषदेच्या कारवाईकडे लक्ष

नवराष्ट्रच्या प्रतिनिधीने याबाबत अनेकवेळा प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासन खरंच सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक कारवाई करणार की पुन्हा कागदी घोडेच नाचवणार, याकडे संपूर्ण शेवगाव शहराचे लक्ष लागले आहे.

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई होणार आहे?

    Ans: आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक या परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई होणार आहे.

  • Que: अतिक्रमण कारवाईबाबत कोणता आरोप करण्यात आला होता?

    Ans: अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत पक्षपात केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

  • Que: नगरपरिषदेने अतिक्रमण कारवाई कधीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?

    Ans: नगरपरिषद प्रशासनाने २ ऑक्टोबरपासून कारवाईला सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: Ambedkar chowk shivaji maharaj chowk encroachment action council sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra
  • Navarashtra Impact

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार
1

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट
2

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
3

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

MIDC Water Theft: दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले
4

MIDC Water Theft: दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.