
i7 eDrive50 ची 728 किमीपर्यंत रेंज
BMW i7 eDrive50 मध्ये 112.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक सेडान 455 hp पॉवर आणि 660 Nm टॉर्क तयार करते. 0-100 kmph वेग पकडण्यासाठी तिला फक्त 5.5 सेकंद लागतात, तर टॉप स्पीड 210 kmph आहे. कंपनीच्या दाव्यानुसार WLTP प्रमाणित रेंज 728 किमीपर्यंत आहे. 250 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज करण्यासाठी 28 मिनिटे लागतात.
BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
i7 M70 xDrive सर्वात पॉवरफुल
i7 M70 xDrive ही या रेंजमधील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक आवृत्ती आहे. ड्युअल मोटर सेटअपमधून 680 hp पॉवर आणि 1,015 Nm टॉर्क मिळतो. Launch Control आणि M Sport Boost वापरल्यास टॉर्क 1,100 Nm पर्यंत पोहोचतो. ही कार फक्त 3.8 सेकंदांत 0-100 kmph वेग गाठते आणि तिची टॉप स्पीड 250 kmph आहे. WLTP रेंज 686 किमीपर्यंत असल्याचा दावा आहे.
740i मध्ये दमदार पेट्रोल इंजिन
पेट्रोल पर्याय म्हणून 740i मध्ये 3.0-लिटर 6-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. ते 400 hp पॉवर आणि 540 Nm टॉर्क देते. 0-100 kmph स्पीडसाठी 5.4 सेकंद लागतात आणि टॉप स्पीड 250 kmph आहे.
नवीन 7 Series मध्ये इल्यूमिनेटेड किडनी ग्रिल, Swarovski क्रिस्टल हेडलॅम्प्स आणि 600 मीटरपर्यंत प्रकाश देणारे अॅडॅप्टिव्ह LED हेडलॅम्प्स आहेत. केबिनमध्ये नवीन Panoramic iDrive with Operating System X, 17.9-इंच सेंटर डिस्प्ले आणि 31.3-इंच 8K थिएटर स्क्रीनसारखी वैशिष्ट्ये मिळतात. विशेष म्हणजे 740i आणि i7 eDrive50 चे उत्पादन चेन्नईतील BMW प्लांटमध्ये होते, तर i7 M70 xDrive भारतात CBU मार्गाने आणली जाते.