फोटो सौजन्य: @SHIVAMespeare/X.com
भारतीय ऑटोमोबाईलमध्ये वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तर अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात धमाकेदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे सिट्रोएन. या फ्रेंच ऑटो कंपनीने मार्केटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने भारतात त्यांची नवीन कार लाँच केली आहे.
फ्रेंच कार उत्पादक कंपनी सिट्रोएनने भारतात त्यांची नवीन Citroen Basalt X लाँच केली आहे. ही कार मिड-स्पेक आणि टॉप-स्पेक ट्रिम्सवर आधारित आहे. जरी या कारचे एक्सटिरिअर डिझाइन नुकत्याच लाँच झालेल्या मॉडेलसारखीच असली तरी, याचे इंटिरिअर नवीन थीम आणि अनेक उत्तम फीचर्ससह सुसज्ज आहे. चला जाणून घेऊया की सिट्रोएन बेसाल्ट एक्स कोणत्या खास फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे.
एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! ‘या’ मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी
Basalt X चे एक्सटिरिअर डिझाइन रेग्युलर Basalt मॉडेलसारखेच आहे. यात V-shape LED DRLs, प्रोजेक्टर LED हेडलाइट्स आणि रॅपअराउंड LED टेललाइट्स देण्यात आल्या आहेत. ग्रिलवर लायटिंग स्ट्रिप्स आणि टेलगेटवर Basalt X ची बॅजिंग दिली आहे. यासोबतच 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि रग्ड बॉडी क्लॅडिंग देखील मिळते.
याच्या इंटिरिअरमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. Basalt X च्या हायर व्हेरिएंटमध्ये ब्लॅक आणि टॅन इंटिरिअर थीम देण्यात आली आहे, जी रेग्युलर मॉडेलच्या ऑल-व्हाईट इंटिरिअरपेक्षा अधिक प्रीमियम वाटते. मिड-स्पेक मॉडेलमध्ये ग्रे आणि व्हाईट थीम देण्यात आली आहे. यामध्ये ट्विन कपहोल्डर्ससह रियर सेंटर आर्मरेस्टचाही समावेश करण्यात आला आहे.
फीचर्सच्या बाबतीत, बेसाल्ट एक्समध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि ॲम्बियंट लाइटिंग सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! ‘या’ मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी
या कारचे इंजिन दोन इंजिन पर्यायांसह लाँच करण्यात आले आहे. यात 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 82 पीएस पॉवर आणि 115 एनएम टॉर्क जनरेट करते, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.
त्याचे दुसरे 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 110 पीएस पॉवर आणि 190 एनएम (एमटी) किंवा 205 एनएम (एटी) टॉर्क जनरेट करते. याला 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे.पर्यायांसह लाँच केले गेले आहे. यात 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 82 पीएस पॉवर आणि 115एनएम टॉर्क जनरेट करते, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.
त्याचे दुसरे 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 110 पीएस पॉवर आणि 190 एनएम (एमटी) किंवा 205 एनएम (एटी) टॉर्क जनरेट करते. याला 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे.
Ola इलेक्ट्रिकची बाजारात जोरदार ‘मुसंडी’! Bajaj ला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर कब्जा
Basalt X मध्ये तीन मुख्य व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत – YOU, PLUS आणि MAX. YOU व्हेरिएंटमध्ये PURETECH 82 MT (1.2P NA) इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे, ज्याची किंमत 7,95,000 रुपये आहे. PLUS व्हेरिएंटमध्ये PURETECH 82 MT (1.2P NA) ची किंमत 9,42,000 रुपये, तर PURETECH 110 MT (1.2P TURBO) ची किंमत 10,82,000 रुपये आणि PURETECH 110 AT (1.2P TURBO) ची किंमत 12,07,000 रुपये ठेवली आहे. याशिवाय, MAX व्हेरिएंट PURETECH 110 MT (1.2P TURBO) मध्ये 11,62,500 रुपये आणि PURETECH 110 AT (1.2P TURBO) मध्ये 12,89,500 रुपयांना उपलब्ध आहे.