एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! 'या' मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी
Tesla Model Y Delivery: भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना दमदार मागणी मिळत आहे. हीच मागणी इतर देशातील ऑटो कंपन्यांना भारतात दमदार इलेक्ट्रिक कार लाँच करण्यास प्रोत्साहित करत आहे. अनेक ऑटो कंपन्या जसे की टाटा मोटर्स, किया, ह्युंदाई इलेक्ट्रिक वाहनांवर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.
जगभरात आपल्या इलेक्ट्रिक कार्सच्या जोरावर नाव कमावणारी टेस्ला कंपनीने 15 जुलै 2025 रोजी भारतात लाँच झाली. तसेच मुंबईतील BKC येथे कंपनीने त्यांचे पहिले शोरूम उघडले. कंपनीने मार्केटमध्ये टेस्ला मॉडेल Y लाँच केली होती. आता याच कारची पहिली डिलिव्हरी 5 सप्टेंबर 2025 रोजी झाली आहे.
Ola इलेक्ट्रिकची बाजारात जोरदार ‘मुसंडी’! Bajaj ला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर कब्जा
मुंबईतील ‘टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर’ मधून शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी पहिल्या टेस्ला कारची डिलिव्हर करण्यात आली. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील शोरूममधून मॉडेल Y ची पहिली डिलिव्हरी घेतली. मुंबईतील भारतातील पहिल्या ‘टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर’चे उद्घाटन या वर्षी 15 जुलै रोजी झाले. कारची डिलिव्हरी मिळाल्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. तसेच त्यांनी ही कार त्यांच्या नातवासाठी खरेदी केल्याचे सांगितले.
सरनाईक म्हणाले, “आज भारतात पहिली टेस्ला कार खरेदी केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. याद्वारे, मी जागरूकता पसरवू इच्छितो आणि लोकांना अधिक पर्यावरणपूरक वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहित करू इच्छितो. पुढील 10 वर्षांत अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावतील. मी माझ्या नातवासाठी ही पहिली कार खरेदी केली आहे आणि ज्या पालकांना अशा कार परवडतील त्यांनी त्यांच्या मुलांना सोडण्यासाठी त्यांचा वापर करावा अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तरुण पिढीमध्येही EV बद्दल जागरूकता पसरेल.”
GST Cut On Cars: Mahindra THAR ते Toyota Innova किती स्वस्त होणार कार्स, पूर्ण तपशील एका क्लिकवर
कंपनीने 15 जुलै रोजी त्यांच्या इलेक्ट्रिक मिडसाईज SUV टेस्ला मॉडेल Y लाँच करून भारतीय ऑटोमोबाईल बाजारात प्रवेश केला. त्याची किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे. टेस्लाचे मॉडेल Y हे भारतीय बाजारात उपलब्ध असलेले एकमेव मॉडेल आहे. त्याचे दोन व्हेरिएंट आहेत, रियर-व्हील ड्राइव्ह आणि लाँग रेंज रियर-व्हील ड्राइव्ह. पहिल्या व्हेरिएंटची किंमत 60 लाख रुपये आहे आणि दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 68 लाख रुपये आहे. या दोन व्हेरिएंटपैकी, लाँग रेंज रिअर व्हील ड्राइव्हची रेंज 622 किमी आहे आणि ती 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास स्पीड वाढवते.