Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका चार्जवर 296 किमीची रेंज! Bajaj ने लाँच केली इलेक्ट्रिक रिक्षा; किंमत स्वस्त आणि फीचर्स जबरदस्त

भारतात टू व्हिलर सेगमेंटसोबतच थ्री व्हीलर सेगमेंटमधील वाहनांना सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसते. नुकतेच Bajaj Auto ने या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक रिक्षा लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 15, 2026 | 07:39 PM
फोटो सौजन्य: @iguddugufran/ X.com

फोटो सौजन्य: @iguddugufran/ X.com

Follow Us
Follow Us:
  • बजाजची इलेक्ट्रिक रिक्षा लाँच
  • Bajaj WEGO Electric असे या ई-रिक्षाचे नाव
  • सुरवातीची किंमत 3,11,908 (एक्स-शोरूम) लाख रुपये
Bajaj Auto ने भारतात आपल्या नव्या WEGO ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची संपूर्ण रेंज लाँच केली आहे. या लाँचमुळे कंपनीने इलेक्ट्रिक ऑटो सेगमेंटमध्ये मोठी झेप घेतली आहे. WEGO रेंजमध्ये प्रवासी (पॅसेंजर) आणि मालवाहू (कार्गो) अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे, त्यामुळे ती विविध वापरासाठी उपयुक्त ठरते. शहरातील वापर लक्षात घेऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ही वाहने खास डिझाइन करण्यात आली आहेत. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3,11,908 रुपये ठेवण्यात आली आहे. लांब रेंज, आधुनिक फीचर्स आणि मजबूत डिझाइन यांचे उत्तम कॉम्बिनेशन या वाहनांमध्ये पाहायला मिळते.

कार खरेदीदारांनो लागा तयारीला! New Renault Duster च्या डिलिव्हरीला सुरुवात, कोणता मॉडेल सर्वात आधी मिळणार?

विविध मॉडेल्स आणि किंमत

Bajaj WEGO रेंजमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. P50 मॉडेलच्या P5009 व्हेरिएंटची किंमत 3,11,908 रुपये असून, ते एकदा चार्ज केल्यावर सुमारे 213 किमीपर्यंत धावते. P5012 व्हेरिएंट 272 किमी रेंज देते आणि त्याची किंमत 3,69,301 रुपये आहे.

P70 मॉडेलमध्ये P7009 व्हेरिएंटची किंमत 3,23,001 रुपये असून, त्याची रेंज 182 किमी आहे. तर P7012 व्हेरिएंट 259 किमीपर्यंत धावते आणि त्याची किंमत 3,63,062 रुपये आहे.

सर्वाधिक रेंज देणारे P90 मॉडेल असून, त्याचे P9018 व्हेरिएंट सुमारे 296 किमीपर्यंत चालते. याची किंमत 4,48,303 लाख रुपये आहे. कार्गो सेगमेंटमध्ये C90 मॉडेलच्या C9009 व्हेरिएंटची किंमत 3,87,371 लाख रुपये असून, त्याची रेंज 149 किमी आहे. C9012 व्हेरिएंट 207 किमीपर्यंत धावते आणि त्याची किंमत 4,34,128 लाख रुपये आहे.

Volkswagen Taigun : आता सेफ्टीची चिंता सोडा; 75 टक्के बायबॅक गॅरंटीसह जबराट SUV लॉन्च

दमदार फीचर्स आणि बॅटरी तंत्रज्ञान

Bajaj WEGO चे इलेक्ट्रिक तीनचाकी त्यांच्या सेगमेंटमध्ये प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखले जातात. मोठे आणि मजबूत डिझाइन असल्यामुळे प्रवासी आणि मालासाठी अधिक जागा उपलब्ध होते. यात मोनोकोक चेसिस आणि मेटल बॉडीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे टिकाऊपणा वाढतो.

फीचर्समध्ये ऑल-एलईडी लाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. तसेच हिल होल्ड असिस्ट, पार्क असिस्ट आणि रोल-ओव्हर डिटेक्शनसारखी सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहेत. यामध्ये Eco, Power आणि Climb असे तीन राइडिंग मोड्स आहेत. 17.7 kWh पर्यंतची मोठी बॅटरी देण्यात आली असून, ही गाडी सुमारे 5 तासांत पूर्ण चार्ज होते. रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीममुळे बॅटरीची कार्यक्षमता वाढते.

वॉरंटी आणि सर्विस

कंपनीकडून WEGO रेंजवर 5 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. यासोबतच रोडसाइड असिस्टन्सची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान अडचण आल्यास त्वरित मदत मिळते. देशभरात 1500 पेक्षा जास्त सर्विस सेंटर्सच्या नेटवर्कमुळे ग्राहकांना सेवा सहज उपलब्ध होते, ज्यामुळे या वाहनांवर विश्वास अधिक वाढतो.

Web Title: New electric auto rickshaw bajaj wego electric launched know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Bajaj

संबंधित बातम्या

EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या
1

EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या

एकाच चार्जमध्ये 1,205 km! Lucid Air GT ने रचला होता इलेक्ट्रिक कार जगतात नवा विक्रम
2

एकाच चार्जमध्ये 1,205 km! Lucid Air GT ने रचला होता इलेक्ट्रिक कार जगतात नवा विक्रम

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लडाखमध्ये दाखल; आता नजर थेट फ्लॅगशिप अ‍ॅडव्हेंचर बाईकवर
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लडाखमध्ये दाखल; आता नजर थेट फ्लॅगशिप अ‍ॅडव्हेंचर बाईकवर

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
4

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.