Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

ऑक्टोबर २०२६ मध्ये भारतीय बाजारात येणाऱ्या नवीन ऑडी Q3 चे बुकिंग सुरू झाले आहे. १ लाख रुपये टोकन रक्कम भरून ग्राहक ही लक्झरी एसयूव्ही बुक करू शकतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 01, 2026 | 02:59 PM
न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
Follow Us
Follow Us:
  • नवीन ऑडी Q3 च्या केबिनमध्ये गिअर सिलेक्टर आता स्टीयरिंग कॉलमवर हलवण्यात आला असून, डॅशबोर्डला एक आकर्षक डिजिटल लूक देण्यात आला आहे.
  • भारतीय मॉडेलमध्ये २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, जे २०४ hp पॉवर आणि ३२० Nm टॉर्क जनरेट करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
  • कारच्या बूट स्पेसमध्ये वाढ करण्यात आली असून, मागील सीट फोल्ड केल्यावर १३८६ लिटरपर्यंतची मोठी स्पेस सहज उपलब्ध होते.

ऑडीने ऑक्टोबर २०२६ मधील भारतातील लाँचिंगपूर्वी त्यांच्या न्यू जनरेशनच्या Q3 कारचे बुकिंग सुरू केले आहे. या कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्हीसाठी कस्टमर ऑडी इंडियाच्या ऑफीशल वेबसाइट, myAudi Connect ॲप किंवा ऑडीच्या अधिकृत डीलरशिपवरून १ लाख रुपये टोकन रक्कम भरून बुकिंग करू शकतात. नवीन Q3 च्या एक्सरिअर आणि केबिनमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, भारतीय आवृत्तीमध्ये २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे.

इंटिरियर मधील बदल

केबिनमध्ये झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे ऑडीने गिअर सिलेक्टर सेंटर कन्सोलवरून स्टीयरिंग कॉलमवर हलवला आहे. या बदलामुळे समोरील दोन सीटच्या दरम्यान अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे, तर लायटिंग आणि वायपरच्या कामांसाठी एक स्वतंत्र स्टॉल देण्यात आला आहे. डॅशबोर्डवर ऑडीची नवीन डिझाइन भाषा पाहायला मिळते, ज्यामध्ये नवीन डिजिटल इंटरफेस आहे. तसेच समोरील खिडक्यांसाठी ॲकॉस्टिक ग्लास वापरण्यात आल्यामुळे बाहेरील आवाज कमी होण्यास मदत होईल.

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

सिटींग अरेंजमेंट

दुसऱ्या रांगेतील (सेकंड रो) सीट आता पुढे-मागे सरकवण्याची (स्लायडिंग ॲडजस्टमेंट) आणि त्याचे बॅकरस्ट अँगल बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. स्टँडर्ड कॉन्फिगरेशनमध्ये कारची बूट स्पेस ४८८ लिटर आहे आणि मागील सीट पाठीमागच्या बाजूला फोल्ड केल्यावर ती १३८६ लिटरपर्यंत वाढते. स्लायडिंग सीटमुळे प्रवाशांना गरजेनुसार प्रवाशांची बसण्याची जागा किंवा सामान ठेवण्यासाठी जागा याचे नियोजन करता येते.

पावर आणि पर्फोर्मंस

व्हेरिएंटनुसार नवीन Q3 याद्वारे २,१०० किलोपर्यंतचे वजन ओढू शकते. कारचे बाह्य डिझाइन जुन्या Q3 पेक्षा पूर्णपणे वेगळे आणि आकर्षक आहे. स्लिम हेडलॅम्प्सच्या मध्ये एक मोठी सिंगलफ्रेम ग्रिल दिली असून बॉनेट आणि शोल्डर सेक्शनवर अधिक स्पष्ट रेषा (कौटर्स) पाहायला मिळतात. मागील बाजूस संपूर्ण रुंदी पसरलेला लाइट एलिमेंट देण्यात आला आहे, तर टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये डिजिटल ओएलईडी टेल लॅम्प्स आणि इल्युमिनेटेड ऑडी रिंग्ज मिळतील.

फीचर्स आणि इंजिन

मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्पमध्ये मायक्रो एलईडी मॉड्यूल्स आहेत आणि प्रत्येक डे-टाइम रनिंग लाइटमध्ये २३ वैयक्तिक सेगमेंट्स समाविष्ट आहेत. भारतासाठी येणाऱ्या नवीन पिढीच्या ऑडी Q3 मध्ये २.०-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे, जे सुमारे २०४ hp पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करते. यात ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम दिली जाईल.

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑडीने Q3 च्या इंजिन पर्यायांमध्ये वाढ केली आहे, जिथे नवीन पिढीमध्ये पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझाइन इंजिन्ससह प्लग-इन हायब्रिड पर्यायही मिळत आहेत. बाजारापेठेनुसार आणि व्हेरिएंटनुसार कंपनीने स्टँडर्ड, स्पोर्ट किंवा टू-व्हॉल्व्ह डॅम्पर कॉन्फिगरेशनसह सस्पेंशन रेंजमध्येही बदल केले आहेत. नवीन Q3 मधील ड्रायव्हर असिस्टन्स तंत्रज्ञानामध्येही सुधारणा करण्यात आली आहे. कारमधील एक अंतर्गत कॅमेरा ड्रायव्हरच्या थकव्यावर आणि लक्ष विचलित होण्यावर लक्ष ठेवू शकतो, तर अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन-असिस्टन्स सिस्टीममध्ये अतिरिक्त फिचर्स जोडले गेले आहेत. पार्किंग सिस्टीम क्लिष्ट पार्किंग मॅन्युव्हर्स सेव्ह करू शकते आणि नंतर ती स्वतःहून रिपीट करू शकते.

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर यांचे मनोगत

बुकिंग सुरू करण्याबाबत भाष्य करताना ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठी एक रोमांचक टप्पा आहे कारण आम्ही अगदी नवीन ऑडी Q3 चे बुकिंग सुरू करत आहोत. नवीन ऑडी Q3 मध्ये आजचा ऑडी ग्राहक जे शोधत आहे ते सर्व काही एकत्र आणले आहे – एक आकर्षक आणि प्रगत डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डायनॅमिक परफॉर्मन्स आणि रोजच्या वापरासाठी उपयुक्त अशी लवचिकता. आम्हाला नवीन Q3 बाबत ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या SUV पोर्टफोलिओला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने बुकिंग सुरू करणे हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.”

 

Web Title: New gen audi q3 bookings open in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Audi
  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
1

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?
2

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
3

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स
4

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.