
मारुती बलेनो
नव्या बलेनोमध्ये 1.2L, 3-सिलिंडर Z-Series पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 82 bhp पॉवर आणि 112.4 Nm टॉर्क देते. पेट्रोलमध्ये कंपनीचा दावा केलेला मायलेज 23.8 kmpl आहे. याशिवाय CNG पर्यायही मिळतो. नव्या मॉडेलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Level 2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससारखी फीचर्स. त्यामुळे मायलेज आणि टेक्नोलॉजीला जास्त महत्त्व देणाऱ्यांसाठी बलेनो मजबूत पर्याय ठरते.
ह्युंदाई i20
ह्युंदाई i20 मध्ये 1.2L, 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन असून ते 82 bhp आणि 114.7 Nm टॉर्क देते. या कारची खासियत म्हणजे प्रीमियम केबिन अनुभव आणि IVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. 2,580 mm चा व्हीलबेस असल्याने केबिनमध्ये चांगली जागा मिळते. त्यामुळे शहरात आरामदायी आणि स्मूथ ड्रायव्हिंगला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी i20 आकर्षक पर्याय आहे.
टाटा अल्ट्रोज
टाटा अल्ट्रोजमध्ये 1.2L, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन 87 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क देते. यात AMT आणि DCT ऑटोमॅटिक पर्यायांसह पेट्रोल आणि CNG पॉवरट्रेन मिळतात. 345 लिटरची बूट स्पेस या तिघांमध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे मोठ्या बूटसह विविध पॉवरट्रेनचा पर्याय आणि मजबूत सेफ्टी पॅकेज हवे असल्यास अल्ट्रोज विचारात घेता येते. एकंदरीत, मायलेज व फीचर्ससाठी बलेनो, रिफाइनमेंटसाठी i20 आणि बहुपयोगी पॅकेजसाठी अल्ट्रोज योग्य ठरू शकते.