
फोटो सौजन्य: @Drivein_lane/ X.com
एमजीने नवीन MG Hector लाँच केली आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये कंपनीने अनेक अपडेट्स दिले आहेत. कंपनी ती “डिझाइन टू सरप्राईज” या नावाने देत आहे.
कंपनीकडून नवीन MG Hector ला 5 आणि 7 सीटर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. या एसयूव्हीमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. सेगमेंटमध्ये प्रथमच iSwipe टच जेस्चर कंट्रोल फीचर देण्यात आले असून, यासोबतच नवीन Aura Hekt फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
इंटिरिअरबाबत बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीमध्ये ड्युअल टोन इंटिरिअर, हायड्रा ग्लॉस फिनिश ॲक्सेंट्स, 14 इंच पोर्ट्रेट इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल ब्लूटूथ की, रिमोट AC, 17.78 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 डिग्री कॅमेरा, LED लाइट्स, ॲम्बियंट लाइटिंग, PM 2.5 फिल्टर, रेन सेन्सिंग वायपर, Level-2 ADAS, ABS, EBD, ESP, हिल होल्ड कंट्रोल, ब्रेक असिस्ट, TCS यांसह 70 पेक्षा अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.
पाहताच क्षणी प्रेमात पाडेल अशी Royal Enfield Classic 350! फक्त द्यावा लागेल 4,299 रुपयांचा EMI
MG कडून या एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 143 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबतच या एसयूव्हीसाठी CVT आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचे पर्यायही देण्यात आले आहेत.
MG कडून नवीन Hector ची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 19.49 लाख रुपये आहे.