Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

TomTom Traffic Index 2025 च्या रिपोर्टनुसार, भारतातील मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. चला अशा काही शहरांबद्दल जाणून घेऊयात, जिथे नागरिक त्यांच्या आयुष्यातील 100 तास ट्रॅफिकमध्ये वाया जातात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 24, 2026 | 09:37 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील शहरांना ट्रॅफिकचा विळखा
  • नागरिकांचे वर्षातील 100 तास जातात वाया
  • बंगळुरू देशातील सर्वाधिक जास्त ट्रॅफिक असणारे शहर
भारतात रोज हजारोंच्या संख्येत वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. यामुळे साहजिकच रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढत आहे. मग पुढे ट्रॅफिक तर आलंच. वाढत्या शहरीकरणासह ट्रॅफिकमध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे. परिणामी, वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होताना दिसते.

नुकतेच TomTom Traffic Index 2025 कडून एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. या रिपोर्टनुसार, देशातील टॉप 10 सर्वाधिक ट्रॅफिक शहरांमध्ये बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे, जिथे लोकांना दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागतो. याच रिपोर्टच्या आधारे, आम्ही भारतातील टॉप 10 सर्वाधिक ट्रॅफिक-शहरांबद्दल जाणून घेऊयात.

बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज

भारतातील सर्वाधिक ट्रॅफिक असणारी शहरं

बंगळुरू

टॉमटॉम इंडेक्सनुसार, बेंगळुरू या यादीत अव्वल स्थान पटकावला आहे. या शहरातील सरासरी वाहनांचा वेग फक्त 16.6 किमी/तास नोंदवला गेला. येथील रहिवासी 15 मिनिटांत सरासरी 4.2 किमी प्रवास करतात. शिवाय, लोक वर्षाला 168 तास वाहतूक कोंडीत वाया घालवतात.

पुणे

दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे, जिथे सरासरी 18 किमी/ताशी वेग आहे आणि सरासरी 4.5 किमी अंतर 15 मिनिटांत पार केले जाते. येथील लोक वाहतुकीमुळे वर्षाला 152 तास वाया घालवतात.

मुंबई

स्वप्नगरी मुंबई शहरात वाहनांचा सरासरी वेग 20.8 किमी/तास आहे आणि 15 मिनिटांत कापलेले सरासरी अंतर 5.2 किमी आहे. मुंबईतील लोक दरवर्षी त्यांच्या वर्षातील 126 तास वाहतूकीत वाया घालवतात.

नवी दिल्ली

नवी दिल्लीतील वाहनांचा सरासरी वेग 25 किमी/तास आहे, जे या यादीतील सर्वाधिक आहे. लोक 15 मिनिटांत सरासरी 6.3 किमी प्रवास करू शकतात. असे असूनही, वाहतुकीमुळे दरवर्षी 104 तासांचा वेळ वाया जातो.

कोलकाता

कोलकात्यातील वाहनांचा सरासरी वेग फक्त 17 किमी/तास आहे. येथील लोक 15 मिनिटांत सरासरी 4.3 किमी प्रवास करू शकतात. येथील वाहतुकीमुळे दरवर्षी वाया जाणाऱ्या 150 तासांच्या वेळेवरून वाहतुकीचा परिणाम लक्षणीय असल्याचे दिसून येते.

वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक

जयपूर

जयपूरमध्ये वाहनांची सरासरी गती 20.5 किमी प्रतितास आहे. येथे 15 मिनिटांत सरासरी 5.1 किमी अंतर कापले जाते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांचे दरवर्षी सुमारे 121 तासांचा वेळ वाया जातो.

चेन्नई

चेन्नईमध्ये वाहनांची सरासरी गती 19.2 किमी प्रतितास इतकी नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना 15 मिनिटांत सरासरी 4.8 किमी अंतर पार करता येते. तरीही, ट्रॅफिकमुळे येथे दरवर्षी सुमारे 132 तासांचा वेळ वाया जातो.

हैदराबाद

हैदराबादमध्ये वाहनांची सरासरी गती 18.4 किमी प्रतितास आहे. येथे नागरिक 15 मिनिटांत सरासरी 4.6 किमी अंतरच कापू शकतात. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांचा दरवर्षी सुमारे 123 तासांचा वेळ वाया जातो.

एर्नाकुलम

या यादीत एर्नाकुलम नवव्या क्रमांकावर आहे. येथे वाहनांची सरासरी गती 20.1 किमी प्रतितास असून, नागरिक 15 मिनिटांत सरासरी 5.0 किमी अंतर पार करतात. तरीही, ट्रॅफिकच्या समस्येमुळे येथील लोकांचा दरवर्षी 118 तासांचा वेळ वाया जातो.

अहमदाबाद

अहमदाबादमध्ये वाहनांची सरासरी गती 20.7 किमी प्रतितास आहे आणि 15 मिनिटांत सरासरी 5.2 किमी अंतर पार केले जाते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा दरवर्षी सुमारे 106 तासांचा वेळ वाया जात असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

Web Title: Bengulru mumbai pune top 10 traffic cities where citizans spent more than 100 hours in traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • automobile
  • mumbai traffic
  • Pune Traffic
  • Traffic News

संबंधित बातम्या

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा
1

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा

बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज
2

बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज

वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक
3

वाहनधारकांनो ‘ही’ एक चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट सस्पेंड! केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम केले अजूनच कडक

दमदार फीचर्ससह Mahindra कडून Thar Roxx Star एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह Mahindra कडून Thar Roxx Star एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.