
फोटो सौजन्य: Gemini
नवीन MINI Convertible S मध्ये MINI चा पारंपरिक ओळखीचा डिझाइन कायम ठेवण्यात आला आहे, मात्र त्यात अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. समोर गोलाकार LED हेडलॅम्प्स देण्यात आले असून, त्यामध्ये तीन वेगवेगळे DRL पॅटर्न्स मिळतात. नवीन ग्रिल आणि वेलकम-गुडबाय लाईट अॅनिमेशन या कारला वेगळी ओळख देतात, ज्यामध्ये MINI चा लोगो जमिनीवर प्रोजेक्ट होतो. कारची कॉम्पॅक्ट लांबी आणि सरळ साइड प्रोफाइल ही तिची खास ओळख आहे. यामध्ये 18-इंच नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. मागील बाजूस LED टेल लाइट्स असून, मधोमध काळ्या पट्टीवर कारचे नाव लिहिलेले आहे. ही कार चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या कारचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याचे सॉफ्ट-टॉप रूफ. काळ्या रंगाचे फॅब्रिक रूफ केवळ 18 सेकंदात उघडते, तसेच 30 km/h वेगातही ते उघडता येते. अर्धवट उघडून याचा सनरूफसारखा वापर देखील करता येतो.
या कारच्या इंटिरिअरकडे पाहिल्यास, MINI ने आपली क्लासिक थीम कायम ठेवली आहे. यामध्ये गोलाकार OLED टचस्क्रीन देण्यात आली आहे, जी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम दोन्हीचे काम करते. ही स्क्रीन MINI च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर चालते आणि वॉइस कमांड सपोर्ट देखील देते.
नवीन MINI Convertible S मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 201 bhp पॉवर आणि 300 Nm चा टॉर्क निर्माण करते. यासोबत 7-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स मिळतो. कंपनीनुसार, ही कार अवघ्या 6.9 सेकंदात 0 ते 100 km/h स्पीड गाठते आणि याची टॉप स्पीड 240 km/h आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, रिअर कॅमेरा आणि अनेक ड्रायव्हर असिस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.